Sonam Raghuvanshi : ‘सोनम फक्त 10 मिनिटांसाठी…’ राजा रघुवंशीच्या मित्राने ओपन केलं भाभीच सिक्रेट
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अजूनही धक्कादायक खुलासे सुरु आहेत. अनेक हादरवून टाकणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. सोनमचा स्वभाव, सवयी अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. हनिमूनला असताना सोनम रघुवंशीने नवरा राजा रघुवंशीची क्रूर पद्धतीने हत्या केली, त्याचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला.

राजा रघुवंशी केसमध्ये आता आणखी एका व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. हा व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून राजा रघुवंशीचा मित्र आहे. हा तोच मित्र आहे, ज्याचा व्हिडिओ मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याच मित्राने अँकर/होस्ट बनून राजा आणि सोनमला लग्नाच्या आधी एका कार्यक्रमात परस्परांना वचन द्यायला सांगितलेलं. या मित्राने, सोनमच्या स्वभावातील काही गुण सांगितले, त्यामुळे राजा खूप त्रस्त असायचा. राजाचा मित्र राज कुलहारेने सांगितलं की, “लग्न ठरल्यानंतर राजा आणि सोनमध्ये दिवसभरात फक्त 10 मिनिटं बोलणं व्हायचं. इतरवेळी सोनम बिझी असल्याचा बहाणा करुन राजाशी बोलणं टाळायची”
राजाच्या मित्राने यावर आश्चर्य व्यक्त केलं. “तो बोलला, माझं लग्न ठरलं, तेव्हा मी आणि माझी पत्नी तासनतास बोलायचो. कोणतं असं कपल आहे, जे दिवसभरात फक्त 10 मिनिटं बोलतं?” राजा रघुवंशीचा मित्र राज कुलहारे पुढे म्हणाला की, “सोनम इतका कमी वेळ देत असूनही राजाने त्या बद्दल कधी तक्रार केली नाही. तो समजूतदार होता. सोनमला तो समजून घ्यायचा” तो म्हणायचा की, “बिझी तर मी पण असतो, पण मी वेळ काढतो. कदाचित सोनम लग्नानंतर गोष्टी समजून घेईल”
वहिनीचा कॉल आला नाही का?
जेव्हा मी राजाला शॉपिंगला घेऊन जायचो, तेव्हा त्याला विचारायचो, तुला वहिनीचा कॉल आला नाही का? त्यावर राजा बोलायचा यार ती जास्त बोलत नाही, असं राज कुलहारेने सांगितलं. त्यावर राजाचा मित्र कुलहारे त्याला बोलला की, परस्परांना समजून घेण्यासाठी वेळ देण्याची गरज असते. सोनम कधी स्वत:हून फोन करायची नाही. राजा तिला फोन करायचा. त्याने पत्नी सोनमवर दबाव टाकला नाही. राज कुलहारे राजा रघुवंशीचा मित्र होता. एकदा एका ड्रेसवरुन राजा आणि सोनम रघुवंशीमध्ये भांडण झाल्याचे राज कुलहारेने सांगितलं.
