जळगावच्या जंगलात काय घडतंय? महिलांच्या डेडबॉड्या शोधण्यासाठी पोलिसांच मोठं सर्च ऑपरेशन

जळगावमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर त्यांची हत्या करुन त्यांना जंगलातच गाडले आहे.

जळगावच्या जंगलात काय घडतंय? महिलांच्या डेडबॉड्या शोधण्यासाठी पोलिसांच मोठं सर्च ऑपरेशन
Amalner Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 29, 2025 | 8:14 PM

महिल्यांवर अत्याचार होणाऱ्या घटना सतत समोर येत असतात. नुकताच महाराष्ट्रातील जळगावतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर मन भरल्यानंतर त्यांची हत्या करुन त्यांना जंगलातच गाडले आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच भर पावसात जंगलात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांची हत्या करणाऱ्या आरोपी अनिल संदानशिव याला पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे. अनिल हा विवाहित महिलांना लक्ष्य करायचा. तो त्यांच्याशी सुरुवातीला गोड बोलायचा. एकदा या महिलांचा विश्वास जिंकला की तो त्यांना घेऊन फिरायला जायचा. अनिल एकदम शांत जंगलात या महिलांना घेऊन जाऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो महिलांची हत्या करायचा. कोणालाही मृतदेह सापडू नये म्हणून तो जंगलात फेकून द्यायचा.

वाचा: लव्ह मॅरेजच्या ४ महिन्यांनंतर माझा पती…; शिपायाचा पर्दाफाश! पत्नीने बनवला व्हिडीओ, यूपी पोलिसही चक्रावले

आरोपी अनिल संदानशिव याने अशाच प्रकारे इतरही महिलांची हत्या केली असावी? या शक्यतेच्या अनुषंगाने जंगल परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. शोध मोहिमेत जंगल परिसरात आणखी काही संशयास्पद आढळून येते का या दृष्टिकोनातून पोलीस पाहणी करत आहेत.

पोलिस सर्च ऑपरेशन सुरु

ज्या जंगलात दोन महिलांच्या हत्या झाल्या, त्याच संपूर्ण जंगलामध्ये भर पावसामध्ये अमळनेर पोलिस सर्च ऑपरेशन राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे. 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या माध्यमातून जंगलातला कोपरान कोपरा हा हुडकून काढला जात आहे. आणखी काही महिलांचे मृतदेह किंवा मृतदेहाचे अवशेष सापडतात का ? या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांचे माध्यमातून जंगलातील झाडे झुडपे संपूर्ण परिसर हुडकून काढला जात आहे.