AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : लग्नाची धूम, पांढरेशुभ्र कपडे, हातात पिस्तूल, दहशत माजवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून कारवाई

जळगावच्या गेंदालाल मिल परिसरात राहणारा सद्दाम उर्फ युनूस सलीम पटेल हा तरुण स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी खिशात पिस्तूल घेऊन शहरात फिरायचा (Jalgaon police arrest youth who danced with gun)

VIDEO : लग्नाची धूम, पांढरेशुभ्र कपडे, हातात पिस्तूल, दहशत माजवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून कारवाई
लग्नाची धूम, पांढरेशुभ्र कपडे, हातात पिस्तूल, दहशत माजवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून कारवाई
| Updated on: May 21, 2021 | 6:08 PM
Share

जळगाव : आजकाल शहराशहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही तरुणांना हातात बंदूक घेऊन शहरात दहशत निर्माण करण्याचा वेगळाच काहितरी छंद लागल्याचं चित्र आहे. आपल्या हातात बंदूक असली म्हणजे आपण जणूकाही शहराचा बाहुबलीच आहोत, अशा अविर्भावत हे तरुण वागत असतात. विशेष म्हणजे या तरुणांना इतर काही तरुण पाठिंबा देत असल्याने या लोकांची एक विशिष्ट टोळीच तयार होते. ही टोळी मग दुसऱ्या टोळीशी भांडण करते. त्यानंतर हळूहळू इतर गुन्हेगारीच्या घटना घडतात. या अशा वाट चुकलेल्या तरुणांना पुन्हा मार्गावर आणणं पोलिसांपुढे मोठं आव्हान असतं. पोलीस त्यांच्यापरिने सर्वोतोपरी प्रयत्न करतात. जळगावात देखील असाच काहिसा प्रकार समोर आला आहे (Jalgaon police arrest youth who danced with gun).

नेमकं प्रकरण काय?

जळगावच्या गेंदालाल मिल परिसरात राहणारा सद्दाम उर्फ युनूस सलीम पटेल हा तरुण स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी खिशात पिस्तूल घेऊन शहरात फिरायचा. बिग बाजार परिसरातील पार्किंग परिसरात त्याचा वावर जास्त होता. विशेष म्हणजे हा तरुण शहरात कुठेही गेला तर सोबत बंदूक घेऊन फिरायचा. काही दिवसांपूर्वी तो एका लग्नात सहभागी झाला होता. तिथे वरातीसोबत नाचताना त्याने खिशातून पिस्तूल काढली होती. तो नाचताना हातातील पिस्तूल सारखा फिरवायचा. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने या संबंधिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

सद्दामने व्हायरल केलेल्या व्हिडीओत नेमकं काय होतं?

सद्दामने एका लग्नात नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत काही तरुण त्याला खांद्यावर उचलतात. तो त्यांच्या खांद्यावर उभा राहून अगदी चित्रपटातील कुख्यात गुंडासारखा हातात बंदूक घेऊन नाचत असतो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात एकदम अचूकपणे कैद करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्याला हे सर्व करत असताना पोलिसांची अजिबात भीती वाटली नाही.

व्हिडीओ बघा :

पोलिसांनी कारवाई कशी केली?

बिग बाजार परिसरातील पार्किंग परिसरात सद्दाम गावठी कट्टयासह तीन जीवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगावचे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अक्रम शेख आणि भास्कर ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत केले. यासोबत त्याला अटकही केली (Jalgaon police arrest youth who danced with gun).

हेही वाचा :

सॉरी बाबा, सासरी येऊन चुकले, रडत-रडत व्हिडीओ रेकॉर्ड, विवाहितेची आत्महत्या

माजी पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक शोषण, दोन महिलांची हत्या, घरात 14 मृतदेहांचा खच, हत्येचं गूढ कसं उलगडणार?

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...