AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप लेकाला कॉपी पुरवायला गेला, पोलिसांनी अधिकाऱ्यानी पकडले आणि दिला बेदम चोप, Video तूफान व्हायरल

आपल्या लेकरला कॉपी पुरवायला जाणे एका पालकला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी पालकाला बेदम चोप दिला असून त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

बाप लेकाला कॉपी पुरवायला गेला, पोलिसांनी अधिकाऱ्यानी पकडले आणि दिला बेदम चोप, Video तूफान व्हायरल
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 04, 2023 | 1:28 PM
Share

जळगाव : राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ( 10th Exam )  सुरू आहे. त्या दरम्यान कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामध्ये नुकताच एक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका शाळेत आपल्या विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. पोलिसांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल ( Viral Video ) झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्याने पालकाला मारहाण झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. चोपडा तालुक्यातील अडावद गावातील नूतन ज्ञानमंदिर विद्यालय परिसरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

खरंतर परीक्षा काळात केंद्रापासून 100 मीटर अंतर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. नूतन ज्ञानमंदिर विद्यालयात दहावीची परीक्षा सुरू आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. त्यालाच आपल्या पाल्याला कॉपी पुरवायला जाणाऱ्या एका पाल्याला पोलिसांनी बेदम चोप दिला आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी पकडल्यावर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाल्याला पोलिसांनी पोलिसांच्या काठीनेच चोप दिला आहे. उपस्थित असलेल्या नागरिकांनी याची चित्रीकरण करून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे. त्यामुळे सोशल मिडियासह जळगावमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

सुरुवातीला पोलिसांनी या पालकला हटकले होते. मात्र तरीही कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पालक कॉपी घेऊन जात असतांना प्रतिबंधित क्षेत्रात जाताच पोलिसांनी पोलिस काठीने चोप दिला. त्यावेळी पालक जमिनीवर कोसळला होता. हे संपूर्ण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी हा जळगाव पोलिस दलातील असून गणेश बुवा असे त्यांचे नाव आहे. अडावद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदावर ते कार्यरत आहे. याबाबत वरिष्ठ पोलिसांनी कुठलीही भूमिका घेतली नसून याबाबत कुठलीही कारवाई केल्याचे समोर आलेले नाही.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!