AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : दारू पिऊन शिवी दिल्याचा जाब विचारला, तरूणासह आईवरही केला जीवघेणा हल्ला

ल्याणमध्ये सध्या गुन्हेगारांची दहशत माजली असून सामान्य नागिरकांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. दारू पिऊन आईवरून शिवी देणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या तरूणावर चाकूने हल्ला करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्याला वाचवण्यासाठी त्याची आई मधे आली असता, तिलाही काही तरूणांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

Kalyan Crime : दारू पिऊन शिवी दिल्याचा जाब विचारला, तरूणासह आईवरही केला जीवघेणा हल्ला
| Updated on: Mar 13, 2024 | 10:01 AM
Share

मुंबई | 13 मार्च 2024 : कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारांची दहशत माजली असून सामान्य नागिरकांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. दारू पिऊन आईवरून शिवी देणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या तरूणावर चाकूने हल्ला करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्याला वाचवण्यासाठी त्याची आई मधे आली असता, तिलाही काही तरूणांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत रुपेश सलफे नावाचा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू पिऊन टोळक्याचा धुडगूस

कल्याण पश्चिमेत गेल्या काही दिवसापासून दहशत निर्माण करण्यासाठी मारहाण व चाकूचा हल्ला करण्याचा प्रकार घडत असून आत नागरिकांना घरात राहणे ही मुश्कील झाले आहे. गुन्ह्याचा असाच एक प्रकार कल्याण पश्चिमेला घडला. फिर्यादी रुपेश सलफे हा त्याच्या आईसह घरात बसला होता. तेवढ्यात काही तरूण त्याच्या घराबाहेर आले आणि दारू पीत बसले. नशेत असलेल्या त्या तरूणांनी रुपेशला आईवरून शिवी दिली. याचा राग आल्याने रुपेश घराबाहेर आला आणि त्याने सिवी देणाऱ्या तरूणाला त्याबद्दल जाब विचारला.

मात्र या गोष्टीचा त्या तरूणाला , भाईला जबर राग आला आणि त्याने इतर साथीदारांसह मिळून रुपेशला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. एवढंच नव्हे तर चाकूने त्याच्यावर वारही केले. हा सगळा प्रकार पाहून रुपेशची आई, आपल्या मुलाला वाचवायला मधे पडली असता, त्या तरूणांनी तिच्या वयाचाही मान न राखता, त्या महिलेलाही बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत धमकीही दिली. नंतर ते टोळकं तिथून पसार झालं.

या घटनेत रुपेश जबर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. रवी बाळाराम पाटील उर्फ भु-या भाई, गणेश मारुती पाटील व विकी पाटील असे या आरोपींची नावे असून या आधीही त्यांच्याविरोधात दहशत माजवणे, मारहाण करणे, असे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिस तिनही आरोपींचा शोध घेत आहेत.

Follow Us
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण