AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : सामान आणतो सांगून युवक लॉजवरून पसार, रूममध्ये मृत महिला सापडल्याने खळबळ

काही दिवसांपूर्वी रामबाग परिसरात राहणाऱ्या एका बिझनेसमनने पत्नी-मुलाची हत्या केल्याने कल्याणमध्ये खळबळ माजली होती. आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्टेशन परिसरातील लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

Kalyan Crime : सामान आणतो सांगून युवक लॉजवरून पसार, रूममध्ये मृत महिला सापडल्याने खळबळ
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Dec 11, 2023 | 8:58 AM
Share

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 11 डिसेंबर 2023 :  काही दिवसांपूर्वी रामबाग परिसरात राहणाऱ्या एका बिझनेसमनने पत्नी-मुलाची हत्या केल्याने कल्याणमध्ये खळबळ माजली होती. आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्टेशन परिसरातील लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला ज्या तरूणासोबत लॉजवर आली होती, तो फरार असल्याने त्यानेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहेत.

दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटत नाही तोच लॉजमध्ये महिलेच्या हत्येने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. ज्योती तोरडमल असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी दोन टीम्स पाठवल्या आहेत.

घाटकोपरची महिला कल्याणला कशी पोहोचली ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. मृत महिला ज्योती तोरडमल ही मूळची घाटकोपर येथील रहिवासी आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ज्योती ही भूपेंद्र गिरी या इसमासोबत स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजवर आली होती. मात्र रविवारी सकाळी बराच वेळ उलटूनही त्यांच्या रूमचा दरवाजा कोणीच उघडतं नव्हतं. त्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडला तेव्हा त्यांना रूममध्ये ज्योतीचा मृतदेह आढळल्याने ते हादरलेच. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ महात्मा फुले पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना दिली. पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

सामान आणण्याच्या बहाण्याने तो लॉजमधून बाहेर पडला, तो परतलाच नाही

पोलिसांच्या सांगण्यानुसार, ज्योती ही ज्या इसमासोबत लॉजवर आली होती, तो भूपेंद्र गिरी हा शनिवारी रात्री 8 च्या सुमारास सामान आणण्याच्या बहाण्याने लॉजमधून बाहेर पडला तो परत आलाच नाही. ज्योतीची हत्या करूनच तो पसार झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याने ही हत्या नेमकी का, कशासाठी आणि कधी केली याबद्दल अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. फरार भूपेंद्रच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली असून लवकरच त्याचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं. मात्र नुकत्याच घडलेल्या ेका दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटत नाही तोच स्टेशन परिसरातील लॉजमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत