AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी दिला चोप, मारहाणीची घटना सीसीटीव्ही कैद

जेवणासाठी हॉटेल मालकाला चाकू दाखवणाऱ्या आरोपीला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी भर चौकात चोप देत चांगलेच बदडले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी दिला चोप, मारहाणीची घटना सीसीटीव्ही कैद
हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी दिला चोपImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 29, 2022 | 9:57 PM
Share

कल्याण : कल्याण कोळसेवाडी सूचक नाका परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गुन्हेगारांमुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. यामुळे कल्याण कोळसेवाडी परिसरात गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी आता पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. जेवणासाठी हॉटेल मालकाला चाकू दाखवणाऱ्या आरोपीला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी भर चौकात चोप देत चांगलेच बदडले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

हॉटेल मालकाला चाकू दाखवत धिंगाणा घातला

कल्याण सूचक नाका परिसरात आलिया दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये 25 तारखेला सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान या परिसरातील बाबू नसीम शेख उर्फ बाबू जंगली नावाच्या गुन्हेगारांनी मोफत जेवण घेण्यासाठी हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवत हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला.

हॉटेल चालकाने आधी जेवायला घातले, मग पोलिसांना बोलावले

हॉटेल चालकांनी या गुन्हेगारांचा काटा काढण्यासाठी युक्तीचा उपयोग करत या गुन्हेगारांना मोफत जेवण दिले. आरोपी चाकू दाखवून धमकावत असल्याचे पोलिसांना सांगितले. व्यापाऱ्याची तक्रार येताच कोळसवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या आरोपाची चौकशी केली.

पोलिसांनी हॉटेलबाहेरच आरोपीला चोपले

आरोपीकडून धारदार हत्यार पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीला धडा शिकवण्यासाठी आणि परिसरात या आरोपीची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी हॉटेल बाहेरच या आरोपीची चांगलीच धुलाई केली.

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसाने दिलेला चोप सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वारंवार पोलिसात तक्रार देऊन फक्त दिखावाची कारवाई पोलिसांकडून होत आहे. प्रत्येक वेळी हा आरोपी दोन दिवसात सुटून येऊन पुन्हा परिसरात दहशत माजवत असल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. सध्या पोलिसांनी या आरोपीवर हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे. तर याबाबत या आरोपीच्या घरच्यांकडून मीठ कमी दिल्याने वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल