AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Case : कल्याण हादरलं, अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Kalyan Case : परवा संध्याकाळी कल्याण कोळसाडी परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात एका कब्रस्तानमध्ये सापडला. आज पहाटेपासूनच कल्याण कोळसवाडी परिसरात मोठा फौजफाटा तैनात आहे.

Kalyan Case : कल्याण हादरलं, अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या, पोलिसांचा मोठा फौजफाटा  तैनात
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 25, 2024 | 10:02 AM
Share

कल्याण कोळसेवाडी परिसरात मोठा तणाव आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. भिवंडी बापगाव हद्दीत कब्रस्तान परिसरात मुलीचा मृतदेह सापडला. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी अजूनही फारार आहे. मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल गवळी असं मुख्य आरोपीच नाव आहे. हा अत्यंत खतरनाक गुंड आहे. त्याच्यावर कल्याण पूर्वेत विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय बलात्कार, पॉक्सो सारख्या गुन्हयांमधील हा आरोपी तडीपार होता.

कल्याण कोळशेवाडी पोलिसांच्या सहा पथकांकडून या विशाल गवळीचा शोध सुरु आहे. कल्याण कोळशेवाडी परिसरात अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तणावाचं वातावरण आहे. राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकानी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बदलापूर घटनेच्या पार्शवभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.

चौकाचौकात मोठा बंदोबस्त

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरभरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. परवा संध्याकाळी कल्याण कोळसाडी परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात एका कब्रस्तानमध्ये सापडला. त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजपच्या आमदार सुलभा गायकवाडसह महेश गायकवाड आणि इतर राजकीय पक्षांनी आणि स्थानिक नागरिकांनी मुख्य आरोपीला अटक करावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. राजकीय पक्ष व स्थानिक नागरिकांच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आज पहाटेपासूनच कल्याण कोळसवाडी परिसरात मोठा फौजफाटा तैनात करत चौकाचौकात मोठा बंदोबस्त लावला आहे

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...