AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आशुतोष रांका यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, थेट अभिजीत दिपके यांनी..

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन देशभरात उभारले. नीट पेपरफुटीचा मुद्दा त्यांनी लावून धरला. त्यातच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या महत्वाच्या नेत्यांना ताब्यात घेतले.

मोठी बातमी! आशुतोष रांका यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, थेट अभिजीत दिपके यांनी..
Ashutosh Ranka and Abhijit Dipke
| Updated on: Sep 27, 2026 | 1:06 PM
Share

कॉकरोच जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन सीजेपीने पुकारले. त्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू झाले. मात्र, विद्यार्थी विविध शहरात या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरले. ज्यानंतर सरकारवर दबाव इतका जास्त वाढला की, थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यात आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या पहिल्या प्रादेशिक बैठकीपूर्वी रविवारी आसाममध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली. गुवाहाटीमध्ये पोलिसांनी या संघटनेचे सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आसाम सचिवालयाजवळ आयोजित बैठकीला जाण्यासाठी हे सर्वजण निघाले होते. या बैठकीसाठी सुमारे 200 ते 300 कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची तयारी CJP ने केली होती. मात्र, त्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. ही बैठक शांततापूर्ण होती आणि तिचा उद्देश आसाममधील स्वयंसेवकांना एकत्र आणणे होता. बैठक सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी सभास्थळाकडे जाणारा मार्ग अडवला.

नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गुवाहाटी येथील पोलीस केंद्रात नेण्यात आले. सीजेपी नेते अभिजित दिपके यांच्या माहितीनुसार, अंकित भारद्वाज आणि प्रेम आकाश यांच्यासह आशुतोष रांका अशा संघटनेच्या अनेक महत्वाच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आसाममधील काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. या बैठकीला पोहोचण्यापासून कार्यकर्त्यांना रोखण्यात आले.

या कार्यकर्त्यांना बैठकीच्या ठिकाणी पोहोचण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. डोंगराळ भागात बैठकीसाठी लोक जमा होण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. आता यावर सीजेपी नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सीजेपीकडून या मुद्द्यात मोठे आंदोलन उभारले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील सरकारी शाळेचा मुद्द्या उपस्थित करताना सीजेपी दिसत आहे. अभिजीत दिपके देखील राज्यातील जिल्हा परिषद शाळेचा मुद्दा लावून धरताना दिसले होते.

Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...