AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढल्यावर हटकलं, माथेफिरूची थेट महिला होमगार्डला मारहाण

धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक, अमानुष घटना उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करत 24 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

Mumbai Crime :  लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढल्यावर हटकलं, माथेफिरूची थेट महिला होमगार्डला मारहाण
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 28, 2023 | 4:16 PM
Share

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 28 ऑक्टोबर 2023 : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाइन (mumbai local). लाखो प्रवासी रोज कामानिमित्त या लोकलने प्रवास करत असतात. मात्र आता प्रवास महिलांसाठी सुरक्षित नाही का असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर एका तरूणीने टीसीला मारहाण केली होती. तशीच एक दुसरी घटना मध्य रेल्वे मार्गावर घडल्याचे समोर आले आहे.

तेथे धावत्या लोकलमध्ये एका महिला होमगार्डला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. संतप्त माथेफिरून हे कृत्य केल्याचे समोर आले. याप्रकरणी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत 24 तासांच्या आत त्या माथेफिरू आरोपीला बेड्या ठोकत अटक केली. मारुती अत्राम असे या आरोपीचे नाव असून या आरोपीने अश्याप्रकारे अजून गुन्हे केले आहे का याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत.

का केली मारहाण ?

धावत्या रेल्वेमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता महिलांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या होमगार्डवरही हल्ला करण्यापर्यंत आरोपींची मजल गेली आहे. मध्य रेल्वेच्या कसारा लोकलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. महिला रेल्वे होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या नीरजा मुकादम यांच्यावर हल्ला करण्यात आला. कसारा लोकलमध्ये आरक्षित महिला जनरल डब्यात त्या पेट्रोलिंग करत असताना एक इसम अचानक महिलांच्या डब्यात चढला.

होमगार्ड नीरजा मुकादम यांनी त्याला हटकले आणि महिलांच्या डब्यातून खाली उतरण्यास सांगितलं. मात्र त्या इसमाला या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि संतापच्या भरात त्याने त्या डब्यातच होमगार्ड नीरजा यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने त्यांना बेदम चोपलं, आणि वाशिंद रेल्वे स्टेशन येताच खाली उतरून थेट पळ काढला.

या हल्ल्यात होमगार्ड मुकादम जबर जखमी झाल्या. त्यांनी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली असता अज्ञात आरोपीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गांभीर्याने घेत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने त्याचबरोबर एपीआय देशमुख ,पीएसआय जावळे ,पोलीस शिपाई शेवाळे ,खाडे, देसले, जाधव ,देवळे सह इतर कर्मचाऱ्यांनी कल्याण ते कसारा पर्यंत सर्व स्टेशनवर आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आत आरोपी मारुती अत्राम याला अटक करण्यात आली. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अजून अशाप्रकारचा काही गुन्हा केला आहे का, याचा तपास कल्याण जीआरपी पोलीस करत आहे.

टीसीला झाली होती मारहाण

काही दिवसांपूर्वी अशीच घटना पश्चिम रेल्वे मार्गावर घडली होती. एका तरूणीने टीसीच्या कॉलरला हात लावला आणि तिला मारहाणही केली. टीसीने तिकीटाची विचारणा केल्यानंतर संतप्त तरूणीने हे कृत्य केल्याचे समोर आले होते. चर्चगेट येथून गोरेगावच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एक तरूणी चढली. दादर स्थानक येताच दोन महिला टीसी या डब्यात चढल्या आणि त्यांनी प्रवाशांचे तिकीट, पास तपासण्यास सुरूवात केली. मात्र सदर तरूणीकडे फर्स्ट क्लासचे तिकीट नव्हते, त्यामुळे एका टीसीने तिला दंड भरण्यास सांगितले. तेव्हा आरोपी तरूणीने दंड भरण्यास नकार देत त्या टीसीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. हा वाद वाढला आणि संतप्त तरूणीने त्या टीसीची कॉलरच पकडली तसेच तिला मारहाण आणि धक्काबुक्कीही केली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?