बिलाच्या सुतावरून गाठला 257 कोटींचा स्वर्ग; तळघरात माया, त्याच्या 500 चाव्या, अत्तर व्यापाऱ्याच्या कारनाम्याचा दरवळ

अत्तर व्यापारी पीयूष जैन अतिशय चलाखय. आपल्याकडे भरपूर पैसा हे लोकांना समजू नये म्हणून तो भुक्कड रहायचा. खटारा गाड्यात फिरायचा. त्याच्याकडे फक्त दोन जुन्या चारचाकी गाड्या आहेत.

बिलाच्या सुतावरून गाठला 257 कोटींचा स्वर्ग; तळघरात माया, त्याच्या 500 चाव्या, अत्तर व्यापाऱ्याच्या कारनाम्याचा दरवळ
कानपूरचा अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या तळघरात सापडले घबाड.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 27, 2021 | 12:53 PM

कानपूरः उत्तर महाराष्ट्रात अलीबाबाची गुहा सापडल्याचे तुम्ही वाचलेच. आता तशीच गुहा थेट तिकडे उत्तर प्रदेशातही सापडलीय. कानपूरच्या एका अत्तर व्यापाऱ्याच्या 257 कोटींच्या संपत्तीचा सुंगध असा काही दरवळला की, त्याने आयकर विभागाला अक्षरशः खेचून आणले. अशी कारवाई करायचा कसलाही विचार नसताना सापडलेले हे घबाड पाहून हा विभागही चक्रावून गेलाय. कारण त्यांना धक्काच तितका मोठा बसलाय. बघा, आपल्या इथे काय काय आणि कसे कसे होऊ शकते, याचा अंदाज बांधणेही अवघडय.

असा लागला सुगावा…

कानपूरचा पीयूष जैन. बडी हस्ती. अत्तराचा व्यापार. सगळीकडे वचक आणि मानमरातब औरच. या जैनच्या कंपनीचा एक ट्रक अहमदाबादमध्ये पकडण्यात आला. तेव्हा ट्रकमधील सामानांचे बिल बोगस आढळले. त्यावर कंपन्यांची नावे खोटी होती. शिवाय सर्व बिले पन्नास हजारांच्या आतील. त्याला कारण Eway Bill भरायची गरज पडू नये हे होते. आणि याच सुतावरून तपास यंत्रणांनी चक्क 257 कोटींचा स्वर्ग गाठला.

150 तास झाडाझडती

कानपूरच्या पीयूष जैनच्या घरात तब्बल 150 तास झाडाझडती घेण्यात आली. 50 तास चौकशी केली. तेव्हा इथे 16 अत्यंत महागड्या प्रॉपर्टीची कागदपत्रे हाती लागली. त्यातल्या कानपूरमध्ये 4, मुंबईत 2, दिल्लीतल्या 1 मालमत्तेचा समावेश आहे. दुबईमध्ये सुद्धा या जैनने काळा पैसा गुंतवल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत त्याच्याकडे 257 कोटींची रोकड सापडलीय. कित्येक किलो सोने आहे.

दरवर्षी वॉचमन बदलायचा

पीयूष जैनने जिथे आपले कोट्यवधींचे घबाड ठेवले होते, त्या तळघराच्या राखणासाठी 24 तास एक वॉचमन ठेवलेला असायचा. त्याचा पगार साधरणतः सात-आठ हजारांच्या घरात असेल. त्याला माहितही नव्हते, आपण इतक्या कोट्यवधी रुपयांची सुरक्षा ठेवतोय. हा वॉचमनही दर दोन वर्षाला बदलला जायचा. त्यामुळे आत नेमके काय आहे, हे कुणालाही समजायचे नाही.

भुक्कड रहायचा

पीयूष जैन अतिशय चलाख होता. आपल्याकडे भरपूर पैसा हे लोकांना समजू नये म्हणून तो भुक्कड रहायचा. खटारा गाड्यात फिरायचा. त्याच्याकडे फक्त दोन जुन्या चारचाकी गाड्या आहेत. त्याच गाड्या घेऊन सगळीकडे जायचा. त्यामुळे तो इतरांना खूप साधा वाटायचा. मात्र, त्याची संपत्ती अक्षरशः कुबेरालाही लाजेवल अशी निघाल्याचे पाहून साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

छापे पडले तेव्हा दिल्लीत

पीयूष जैनच्या घरावर छापा पडला तेव्हा तो दिल्लीत होता. त्याच्या वडिलांवर तिथे उपचार सुरू होते. त्याचा मुलगा झारखंडला गेलेला होता. मात्र, बोगस बिले सापडल्याने जैन परिवार गोत्यात आला. पीयूष जैनला तातडीने दिल्लीहून बोलावून घेण्यात आले. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

इतर बातम्याः

उत्तर महाराष्ट्रात अलीबाबाची गुहा…! तब्बल 32 ठिकाणी कारवाई, 175 अधिकाऱ्यांनी 12 तास मोजला पैसा

#ArrestSunnyLeone | सनी लिओनीला अटक करा! सोशल मीडियावर जोरदार मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें