AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6000 मध्ये रशियन, 2000 मध्ये भारतीय, 500 मध्ये खोली… व्हाट्सअॅपवर मिळायच्या सुंदर मुली, नंतर सुरु झालं घाणेरडं काम

व्हाट्सअॅपवर मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवले जायचे. त्यासोबतच रेटही लिहिलेले असायचे. जेव्हा ग्राहकाला मुलगी पसंद पडायची, तेव्हा तिला ग्राहकाने सांगितलेल्या घरात किंवा हॉटेलमध्ये पाठवलं जायचं.

6000 मध्ये रशियन, 2000 मध्ये भारतीय, 500 मध्ये खोली... व्हाट्सअॅपवर मिळायच्या सुंदर मुली, नंतर सुरु झालं घाणेरडं काम
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 13, 2025 | 4:53 PM
Share

जर तुम्हाला सुंदर मुली हव्या असतील तर फक्त या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन करा… असे मेसेज कानपूरमध्ये बरेच पाहायला मिळत होते. जेव्हा या मेसेजमागचं सत्य समोर आलं, तेव्हा सर्वांना घाम फुटला. खरंतर, कानपूरच्या कल्याणपुर परिसरात पोलिसांनी ऑनलाइन देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी व्हाट्सअॅपद्वारे ग्राहकांशी संपर्क साधायची. मुलींचे फोटो आणि रेट आधीच पाठवले जायचे. ग्राहकाने पसंत केल्यानंतर मुलींना हॉटेल, घर किंवा इतर ठिकाणी पाठवलं जायचं.

या रॅकेटची खास बाब म्हणजे, जर ग्राहकाकडे भेटण्यासाठी जागा नसेल, तर टोळी स्वतःच ‘क्यूबिकल’ नावाच्या छोट्या-छोट्या खोल्या भाड्याने द्यायची. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा घराच्या तळघरात अशा क्यूबिकल्सचा शोध लागला, ज्या दोन तासांसाठी 500 रुपयांना भाड्याने दिल्या जायच्या.

वाचा: रेड लाईट एरियात अमानुष छळ, बाहेर येण्यासाठी मोजली इतकी किंमत, 29 वर्षांची प्रसिद्ध हसिना आहे तरी कोण?

रशियन आणि कॉलेजच्या मुलीही होत्या सामील

या टोळीची व्याप्ती फक्त स्थानिक मुलींपुरती मर्यादित नव्हती, तर मागणीनुसार रशियन महिलाही उपलब्ध करून दिल्या जायच्या. याशिवाय, अनेक कॉलेजमधील मुलीही या धंद्यात सामील होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन संचालक, दोन महिला आणि सात ग्राहकांना अटक केली आहे. यामध्ये एक तरुणी आणि दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. छापेमारीदरम्यान पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह सामग्री जप्त केली आहे.

तळघरात चालत होता गैरप्रकार

ज्या घरात हे रॅकेट चालत होतं, तिथे तळघर खास देह व्यापारासाठी तयार करण्यात आलं होतं. क्यूबिकल्स अशा प्रकारे बनवण्यात आली होती की, तिथे दोन तासांसाठी कोणताही ग्राहक थांबू शकेल आणि नंतर दुसरा ग्राहक आत जाईल. एडीसीपी कपिल देव सिंह यांनी सांगितलं की, या टोळीविरुद्ध अनैतिक देह व्यापार (Prevention of Immoral Trafficking Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या रॅकेटशी आणखी कोण-कोण जोडलेले आहे आणि हा धंदा किती काळापासून चालत होता याचाही तपास करत आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.