चिमुरडीवर बलात्कार करुन मर्डर, हैवान काही तासात पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

आता कुठे तिच्या आयुष्याची सुरुवात होत होती. त्याचवेळी एका हैवानाने चिमुरडीसोबत संतापजनक कृत्य केलं. पीडित मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी रितेश कुमारची वाईट नजर तिच्यावर पडली.

चिमुरडीवर बलात्कार करुन मर्डर, हैवान काही तासात पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार
Rape on Small Girl
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 14, 2025 | 10:17 AM

समाजातील काही लोकांमध्ये भरपूर विकृती आणि क्रौर्य भरलेलं आहे. हे क्रौर्य ठेचण्यासाठी कठोर कायदे बनवले. पण त्याचा काही उपयोग होत नाहीय. आता कुठे तिच्या आयुष्याची सुरुवात होत होती. त्याचवेळी एका चिमुरड्या मुलीसोबत संतापजनक घटना घडली. एका नराधमाने छोट्या मुलीवर बलात्कार करुन तिची निदर्यतेने हत्या केली. ही संतापजनक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. आरोपी बिहारी मजूर होता. आरोपीच नाव रितेश कुमार होतं. 35 वर्षाचा रितेश कुमार बिहारचा राहणारा होता. पीडित मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी रितेश कुमारची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने आपला मनातला घाणेरडा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलीला पकडलं व तिला एका शेडमध्ये घेऊन गेला.

मुलगी रडत होती, आरडा-ओरडा करत होती. मुलीच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून लोक तिथे पोहोचले. पण तो पर्यंत आरोपी रितेशने, मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. लोक पोहोचेपर्यंत रितेश तिथून पळून गेलेला. मुलगी घरासमोर खेळत असताना रितेश तिला पकडून शेडमध्ये घेऊन गेला. हे सगळ तिथल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं. आरोपी रितेश विरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत हत्या, पोलिसांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ओळख लपवण्याचा प्रयत्न

पोलिसांनी रितेशला पकडलं. त्यानंतर त्याची काही कागदपत्र घेण्यासाठी आणि त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला त्याच्या घरी नेलं. त्यावेळी रितेशने पोलिसांवर दगडफेक केली व पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्त शशी कुमार म्हणाले की, रितेशने त्याची ओळख पटू नये यासाठी तो सर्व कागदपत्र देत नव्हता व ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.

इंस्पेक्टर आणि दोन पोलीस जखमी

रितेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या महिला अधिकारी, सब-इंस्पेक्टर, अन्नपूर्णाने रितेशला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दोन-तीन राऊंड फायर केले. यात एक गोळी त्याच्या पायात, दुसरी पाठीत लागली. रितेशला लगेच रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रितेशने पोलिसांवर दगडफेक केली. त्यात सब-इंस्पेक्टर आणि दोन पोलीस जखमी झाले.