AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळीजादू की आणखी काही?, त्या हॉटेलात काय घडलं?; पती-पत्नीसोबत आणखी एक बॉडी

अरुणाचल प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशात फिरायला आलेल्या केरळच्या एका दाम्पत्यांचा आणि महिलेचा मृत्यू झाला आहे. एकाच खोलीत या तिघांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्येमागे जादूटोण्याचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून कसून चौकशी सुरू केली आहे.

काळीजादू की आणखी काही?, त्या हॉटेलात काय घडलं?; पती-पत्नीसोबत आणखी एक बॉडी
Kerala coupleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 04, 2024 | 7:32 PM
Share

अरुणाचल प्रदेशातील ईटानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या एका दाम्पत्याचा अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी जिल्ह्यातील एका हॉटेलात मृतदेह आढळून आला आहे. या जोडप्याच्या मृतदेहासोबत एका महिलेचाही मृतदेह आढळून आला आहे. ही महिला त्यांची मैत्रीण असल्याचं सांगितलं जात आहे. हे तिघे या ठिकाणी काय करत होते? तिघांचाही एकाचवेळी मृत्यू कसा झाला? याचा कोडं अद्याप उलगडलेलं नाहीये. यामागे कुणाचं षडयंत्र तर नाही ना? असा संशय पोलीस व्यक्त करत असून त्या दिशेने तपास करत आहेत.

सुबनसिरीचे एसपी केनी बागरा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतांची ओळख पटली आहे. तिघेही केरळचे आहेत. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक टीम स्थापन करण्यात आल्याचं बागरा यांनी सांगितलं. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्हा मुख्यालयाच्या हापोली येथील ब्लू पाईन हॉटेलमध्ये ही घटना घडली. या तिघांनी 27 मार्च रोजी गुवाहाटीसाठी उड्डाण केल्यानंतर 28 मार्च रोजी हॉटेलात चेक इन केलं होतं, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

भाषेच्या शिक्षिका

सकाळी 10 वाजेच्या आसपास हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह तब्यात घेतले. मात्र, या तिघांनी आत्महत्या केली असावी, असा कयास वर्तवला जात आहे. मात्र, आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत, असं या पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. तिरुवनंतपुरमची आर्य आणि कोट्टायम येथील नवीन आणि त्याची पत्नी देवी अशी या तिघांची नावे आहेत. सर्वांचं वय तिशीच्या आसपास आहे. प्राथमिक माहितीनुसार, नवीन हा एक ऑनलाईन व्यापारी होता. तर देवी एका खासगी शाळेत जर्मन भाषेची प्रशिक्षिका होती. आर्य सुद्धा त्याच शाळेत फ्रेंच शिकवत होती.

काळ्याजादूचा शोध

या प्रकारात काळाजादूचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या तिघांच्या मृत्यूचा काळ्याजादूशी काही संबंध आहे का? याचा शोध अरुणाचल पोलिसांची एक टीम काम करत आहे. केरळ पोलीसही या अनुषंगाने तपास करणार असून अरुणाचल प्रदेशात एक टीम पाठवणार आहे. मात्र, या प्रकरणात काळ्याजादूचा काही संबंध आहे की नाही याचा कोणताही थेट पुरावा मिळालेला नसून त्याला कुणी दुजोराही दिलेला नाहीये.

म्हणून त्या दिशेने तपास

तिन्ही मृतांचा व्यवहार असमान्य दिसत होता. त्यांचे फोन आणि आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जोपर्यंत स्कॅन केल्या जात नाहीत, तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असं तिरुवनंतपुरम शहराचे पोलीस आयुक्त सी. नागराजू यांनी सांगितलं. देवीचे वडील एक वन्यजीव फोटोग्राफर आहेत. आपल्या मुलीच्या मृत्यूमागे काळीजादू असावी, असा त्यांना संशय आहे, म्हणून त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.