पोलीस निरीक्षकाच्या दालनातच चाकू हल्ला; कराड शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. (Knife attack in karad)

  • दिनकर थोरात, टीव्ही 9 मराठी, कराड
  • Published On - 18:20 PM, 1 Mar 2021
पोलीस निरीक्षकाच्या दालनातच चाकू हल्ला; कराड शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार
Crime

सातारा : पोलीस निरीक्षक यांच्या दालनात एकावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी पोलिसांना मारेकऱ्यास तात्काळ ताब्यात घेतले आहे. तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Knife attack in karad police inspector room)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन भागवत माने हा कराडमधील हजारमाची गावात राहतो. गेल्या आठवड्यात लखनचा किशोर शिखरे यांच्या वडिलांशी वाद झाला. हा वाद जुन्या कारणातून झाला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर कराड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी किशोर शिखरे आणि लखन माने यांना बोलवले होते. त्यावेळी लखन माने याने किशोर शिखरेवर चाकूने तीन ठिकाणी वार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनात ही घटना घडली.

पोलीस निरीक्षकांच्या दालनात चाकूने वार 

सोमवारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बी. आर. पाटील यांनी तात्काळ मारेकर्‍यास ताब्यात घेतले आहे. लखन भागवत माने (40) असे हल्लेखोराचे नाव आहे. तर किशोर पांडुरंग शिखरे (30) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यावेळी बी.आर. पाटील यांनी तात्काळ मारेकर्‍यास ताब्यात घेतले. तसेच जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पोलीस निरीक्षकांच्या दालनात झालेल्या या घटेनमुळे सर्वांना धक्का बसला आहे. (Knife attack in karad police inspector room)

संबंधित बातम्या : 

उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉडबॉयकडून विनयभंग, केडीएमसी जंबो कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार

कल्याण-डोंबिवलीत एका आठवड्यात तीन महिलांची हत्या, शहर हादरलं

संपत्तीच्या वादातून काकाने जाळली जिनिंग फॅक्टरी, पुतण्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न