कोल्हापूरमध्ये फटाके उडवल्याचा वाद, 2 गटात तुंबळ हाणामारी! दगडफेक करत नंग्या तलवारीही नाचवल्या

Kolhapur crime News : लक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आलेली. शनिवारी पहाटेच्या सुमारास मिरवणूक सुरु असताना फटाके फोडण्यात आले. त्यावरुन दोन गटांत वाद झाला.

कोल्हापूरमध्ये फटाके उडवल्याचा वाद, 2 गटात तुंबळ हाणामारी! दगडफेक करत नंग्या तलवारीही नाचवल्या
तुफान राड्यानंतर गावात तणाव
Image Credit source: TV9 Marathi
भूषण पाटील

| Edited By: सिद्धेश सावंत

May 08, 2022 | 8:52 AM

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime News) फटाके उडवल्यामुळे तुफान वाद झाला. दोन गट या वादातून भिडले. यावेळी जोरदार राडा (Fight Between two groups) झाल्याचं पाहायला मिळालं. दगडफेक करण्यासोबतच नंग्या तलवारीही नाचवत मोठी दहशत माजवण्यात आली. या राड्यात तरुणीसह दोघे जण जखमीदेखील झाले. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील (Shirol, Kolhapur) मजरेवाडी इथं ही घटना घडली. पालखीसमोर फटाके उडवण्याच्या कारणावरुन दोन गटात भांडण झालं. भांडण टोकाला जाऊन जोरदार राडा झाला. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत एक तरुणी जखमी झाली. तर तलवारीच्या हल्ल्यामध्ये एका तरुणाला दुखापत झाली. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी 20 हून अधिक जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्याची पोलिसांकडून चौकशी केली जातेय. या घटनेनंतर गावात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

यात्रेत राडा…

मजरेवाडी इथं लक्ष्मी देवीची यात्रा सुरु होती. या यात्रेदरम्यान लक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आलेली. शनिवारी पहाटेच्या सुमारास मिरवणूक सुरु असताना फटाके फोडण्यात आले. त्यावरुन दोन गटांत वाद झाला.

दोन गटात झालेला वाद वाढत गेला आणि जोरदार राडा झाला. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये दगडफेकी आसावती ढोणे आणि राजेंद्र कागले या दोघांना जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या सांगलीतल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर पोलिसांनी 21 जणांना ताब्यात गेतलं. तर संशयित 23 जणांवर गुन्हे दाखल केलेत. यावेळी झालेल्या हाणामारीत एका कट्ट्याचीही तोडफोड करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें