सहा वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून, मृतदेह झुडपात फेकला, कोल्हापुरातील संतापजनक घटना

कोल्हापुरात एका सहा वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उडकीस आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील खोची येथे ही धक्कादायक घटना घडलीये. ही चिमुकली रविवारच्या दुपारपासून बेपत्ता होती. पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

सहा वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून, मृतदेह झुडपात फेकला, कोल्हापुरातील संतापजनक घटना
जळगावमध्ये पैशासाठी पोलिसानेच घडवली कापूस व्यापाऱ्याची हत्या

कोल्हापूर : कोल्हापुरात एका सहा वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उडकीस आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील खोची येथे ही धक्कादायक घटना घडलीये. ही चिमुकली रविवारच्या दुपारपासून बेपत्ता होती. पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

झुडपात आढळला मृतदेह

कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील खोची गावातील दफनभूमीजवळ झुडपात एका सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. ही मुलगी रविवारच्या दुपारपासून बेपत्ता होती. ती सापडली ती मृतावस्थेतच. या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि या घटनेतील संशयित आरोपी प्रदीप पोवार याला ताब्यात घेतलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या चिमुकलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करतात. आपल्या पोटच्या मुलीचा कुणीतरी खून केला हे कळताच या आई-वडिलांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

डोंबिवलीत बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आरोपी बाप इतकं विचित्र आणि संतापजनक कृत्य कसा करु शकतो? असा सवाल काही स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे आरोपी आठ महिन्याच्या त्याच्या पोटच्या लेकीला दारु पाजवायचा, असा देखील एक संतापजनक प्रकार समोर आलाय. तसेच डोंबिवलीत गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर 30 पेक्षा जास्त नराधमांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना हा असा प्रकार समोर येणं म्हणजे चिंताजनक आहे, असं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जातंय.

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह डोंबिवलीत राहते. पीडितेची आई काही कामानिमित्ताने गावी गेली होती. याच गोष्टीची संधी साधून वासनांध बापाने तिच्याशी लगट करत लैंगिक अत्याचार केला. पीडितेने त्याला प्रतिकार केला असता आरोपी बापाने तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण केली. तसेच तिला धमकी देखील दिली. पीडितेची आई गावावरुन परत आल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने तातडीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे तिने पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी संबंधित प्रकरणाला गांभीर्याने घेत नराधम बापाला बेड्या ठोकल्या. तसेच पोलिसांनी आरोपी बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्या

धक्कादायकः मोबाइलवर मुलगा काय पाहत होता कळलंच नाही, औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI