कोल्हापुरात तृतीयपंथी ‘देवमामा’चा संशयास्पद मृत्यू, घरातील सोन्याचे दागिनेही गायब

| Updated on: Jul 21, 2021 | 3:24 PM

मृतावस्थेत आढळला, तेव्हा त्याच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी घातल्याने चोरीच्या उद्देशाने देवमामाची हत्या झाली असल्याचा संशय बळावला आहे.

कोल्हापुरात तृतीयपंथी देवमामाचा संशयास्पद मृत्यू, घरातील सोन्याचे दागिनेही गायब
कोल्हापुरात तृतीयपंथीयाचा मृत्यू
Follow us on

कोल्हापूर : तृतीयपंथीयाच्या संशयास्पद मृत्यूमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. सतीश पवार उर्फ देवमामा असं मृत तृतीयपंथीयाचे नाव आहे. त्याच्या घरातील सोन्याचे दागिनेही गायब झाल्याने चोरीच्या उद्देशाने देवमामाची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील शिये गावात ही घटना घडली. सतीश पवार उर्फ देवमामा असं मृत तृतीयपंथीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सतीश पवारच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. तो मृतावस्थेत आढळला, तेव्हा त्याच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी घातल्याने चोरीच्या उद्देशाने देवमामाची हत्या झाली असल्याचा संशय बळावला आहे.
दरम्यान शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

केरळात पहिली ट्रान्सजेंडर विधानसभा उमेदवार मृतावस्थेत

दुसरीकडे, केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी अॅलेक्सही (Ananya Kumari Alex) राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोच्चीमधील घरात अनन्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अनन्या कुमारी ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकीही होती.

आत्महत्या केल्याचा संशय

अनन्याने 2020 मध्ये कोच्चीमधील खासगी रुग्णालयात वजायनोप्लॅस्टी शस्त्रक्रिया केली होती. मात्र वर्षभरानंतरही तिला आरोग्याच्या कुरबुरी जाणवत होत्या. ती दीर्घ काळ एका जागी उभी राहू शकत नसे. शारीरिक तक्रारींमुळे तिला काम करण्यात अडथळे येत होते. याच कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शस्त्रक्रियेत चुका झाल्याचा दावा

शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात झाला, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तिचे पार्थिव एर्नाकुलम शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

विधानसभा निवडणुकीत पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार, RJ अनन्या कुमारी राहत्या घरी मृतावस्थेत

बाळाचं अपहरण, नंतर हत्या करुन खाडीत पुरलं, पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीचं अमानवीय कृत्य

(Kolhapur Transgender Devmama aka Satish Pawar found dead at home)