AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalbaugh Murder Case : आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी रिंपलला सँडविचवाल्याने मदत केली?

Lalbaugh Murder Case : हा सँडविचवाला आणि रिंपलच्या कनेक्शनबद्दल पोलिसांना कसं कळलं? चायनीज रेस्टॉरंटमधल्या दोन वेटर्सची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे.

Lalbaugh Murder Case : आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी रिंपलला सँडविचवाल्याने मदत केली?
Veena & Rimple jain
| Updated on: Mar 18, 2023 | 3:46 PM
Share

Lalbaugh Murder Case : लालबागमधल्या हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसलाय. पोटच्या मुलीने आईची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी अजूनपर्यंत पूर्णपणे या गुन्ह्याची उकल केलेली नाही. लालबागमधल्या चाळीत घडलेलं हे हत्याकांड बुधवारी उघड झालं. या प्रकरणात आरोपी मुलगी रिंपल जैन पोलिसांच्या ताब्यात आहे. हे हत्याकांड उघड झाल्यानंतर याच परिसरातला एक सँडविचवाला गायब झाला. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक केलीय.

हा सँडविचवाला रिंपल जैनला ओळखत होता. शुक्रवारी पोलिसांनी दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली. “हा सँडविचवाला व्हॉट्स अपवरुन रिंपलच्या संपर्कात होता. संशयाची सुई त्याच्यावरही आहे. आम्ही क्लीनचीट दिलेली नाही” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

वेटर्सनी काय पाहिलं?

रिंपलवर मार्बल कटरने आई वीणा जैन (55) यांच्या मृतदेहाचे पाच तुकडे केल्याचा आरोप आहे. यामध्ये या सँडविचवाल्याने रिंपलला काही मदत केली का? याचा तपास पोलीस करतायत. याच प्रकरणात चायनीज रेस्टॉरंटमधल्या दोन वेटर्सची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. वीणा यांना गंभीर जखमी अवस्थेत पाहिल्याचा या वेटर्सचा दावा आहे.

चाळीच्या व्हरांड्यातून खाली पडल्यामुळे त्या जखमी झाल्याची शक्यता या वेटर्सनी व्यक्त केली. हे वेटर वीणा यांना पहिल्या मजल्यावरील रुममध्ये घेऊन गेले. त्यांनी रिंपलला नातेवाईकांना या बद्दल माहिती देण्यास सांगितलं.

रिंपल शेजाऱ्यांना काय सांगायची?

27 डिसेंबरची ही घटना आहे. पण रिंपलने या बद्दल काही केलं नाही. अडीच महिन्यानंतर वीण यांच्या भावाने बहिण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. रिंपल आई कानपूरला गेल्याच सर्वांना सांगयची. रिंपलवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना काय सांगितलं?

रिंपलच्या संपर्कात असलेल्या सर्वांची जबानी नोंदवण्यात आली आहे. सँडविचवाल्याची चौकशी सुरु आहे, असं झोन 4 चे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी सांगितलं. पहाटे 4.30 च्या सुमारास टॉयलेटला जाताना आईचा पडून मृत्यू झाला, असं रिपलने पोलिसांना सांगितलं. तपासाच्या भितीने मी घाबरली, त्यातून मी मृतदेहाचे तुकडे केले असं रिपलच म्हणणं आहे. आई आणि मुलीची सतत भांडण व्हायची, असं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.