AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolkata Gangrape Case : पॅनिक अटॅक आला, इनहेलर देऊन सामूहिक बलात्कार, लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर नराधमांचा अत्याचार!

कोलकात्यात एक धक्कदायक प्रकार घडला आहे. येथे एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अत्याचारादरम्यान तिचा व्हिडीओही शूट करण्यात आलाय.

Kolkata Gangrape Case : पॅनिक अटॅक आला, इनहेलर देऊन सामूहिक बलात्कार, लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर नराधमांचा अत्याचार!
kolkata law college student gang raped
| Updated on: Jul 01, 2025 | 3:26 PM
Share

Kolkata Law College Gang Rape Case : दक्षिण कोलकात्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जातोय.मिळालेल्या माहितीनुसार लॉ कॉलेजच्या या 24 वर्षीय पीडित विद्यार्थिनीवर एकूण तिघांनी सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेला अत्याचारादरम्यान पॅनिक अटॅक आला होता. मात्र इनहेलर देऊन पुन्हा या पीडितेवर अत्याचार करण्यात आला आहे.

विद्यार्थिनीला पॅनिक अटॅक आला, पण…

ही अमानवी घटना घडल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास चालू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीवर 25 जूनच्या रात्री 7.30 ते 10.30 वाजेर्यंत हे कुकृत्य करण्यात आलंय. पीडित विद्यार्थिनीने तिच्यासोबत नेमकं काय घडलं? याती आपबीती सांगितली आहे. तक्रारीनुसार आपल्यासोबत काहीतरी अघटीत घडणार याची कल्पना पीडितेला आली होती. त्यानंतर तिला पॅनिक अटॅक आला.

जबरदस्ती नेण्यात आले अन्…

मात्र या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोजित मिश्रा याने आपल्या साथीरादारंना इनहेलर आणायला सांगितले. त्यानंतर हे इनहेलर पीडित विद्यार्थिनीला देण्यात आले. इनहेलरमुळे विद्यार्थिनीला बरे वाटले. तिला श्वास घेता येई लागला. संधी मिळताच तिने त्या नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळ काढला. मात्र महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी काहीच करू शकली नाही.

बलात्कार करताना व्हिडीओ रेकॉर्ड केलं

याच गोष्टीचा फायदा घेत तिन्ही आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जबरदस्तीने सुरक्षा रक्षकांच्या रुममध्ये नेलं. तिथे आरोपींनी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार केले. विशेष म्हणजे मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा विद्यार्थिनीवर अत्याचार करत असताना अन्य दोन आरोपी फोनमध्ये रेकॉर्डिंग रत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्काराचा असाच धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर आता कोलकात्यातील लॉ कॉलेजमध्येच एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....