लॉरेन्स बिश्नोईला कॅनडा सरकारने अतिरेकी घोषीत केले, गँगचाही टेररिस्ट गटात समावेश, काय होणार परिणाम ?

बिश्नोई गँग ही एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना असून जी मुख्यत:भारतातून संचालित असून या गँगचे सदस्य कॅनाडात देखील आहेत. कॅनडात राहणाऱ्या मूळ भारतीय लोकांच्या विभागात ते सक्रीय आहेत.

लॉरेन्स बिश्नोईला कॅनडा सरकारने अतिरेकी घोषीत केले, गँगचाही टेररिस्ट गटात समावेश, काय होणार परिणाम ?
Bishnoi gang as terrorist
| Updated on: Sep 29, 2025 | 9:39 PM

अभिनेता सलमान खान याला धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई याला कॅनडा सरकारने अतिरेकी घोषीत केले आहे. यासोबत त्याच्या गँगला देखील अतिरेकी संघटनेच्या यादी समाविष्ठ केले आहे. ही घोषणा क्रिमिनल कोड अंतर्गत करण्यात आल्याने आता लॉरेन्स बिश्नोई याच्या अडचणीत वाढ होणार आहे.आता या संघटनेची कनाडातील असलेली संपत्ती, वाहन आणि पैशांना जप्त किंवा सिल केले जाऊ शकते.

बिष्णोई गँगला एकदा का दहशतवादी संघटना घोषित केले तर कायदा अंमलबजावणी संस्थांना दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांवर खटला चालवण्यासाठी अधिक साधने उपलब्ध होणार आहेत. कॅनडात किंवा परदेशात कोणताही कॅनेडीयन नागरिक जर या संघटनेची संपत्तीशी देवाण-घेवाण करत असेल तर तो कायदेशीर गुन्हा मानला जाणार आहे. अतिरेकी संघटनेला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपाने आर्थिक मदत करणे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येणार आहे. इमिग्रेशन आणि रिफ्युजी प्रोटेक्शन एक्ट अंतर्गत कॅनडात प्रवेश आणि व्हीसाशी संबंधित प्रकरणावर देखील या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

बिश्नोई गँगला अतिरेकी संघटना ठरवल्याने त्याची कॅनडातील संपत्ती,पैसे, वाहन आणि अन्य वस्तू, जप्त किंवा फ्रीज केल्या जाऊ शकतात. एवढेच नाही तर कॅनडाचे पोलीस आणि सुरक्षा एजन्सींना आता गँग विरोधात कारवाई करण्यासाठी अधिक अधिकार मिळणार आहेत.

काय म्हणाले मंत्री गॅरी आनंदसांगरी ?

कॅनडातील प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की तो त्याच्या घरात आणि समाजात सुरक्षित समजू शकेल. आमची जबाबदारी त्याना नागरिकांना संरक्षण पुरवण्याची आहेय बिश्नोई गँगने समुदायांना हिंसा आणि दहशतीने टार्गेट केले होते. आता जेव्हा या संघटनेला अतिरेकी संघटना म्हणून घोषीत केले आहे. तर आम्हाला यांचे गुन्हे रोखण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी एक मजबूत साधन मिळाले आहे असे कॅनडाचे मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी म्हटले आहे.

आर्थिक नाकेबंदी

या बिश्नोईच्या संघटनेचे नाव आता अतिरेकी संघटनेत समाविष्ठ केल्याने कॅनडाच्या क्रिमिनल कोडच्या यादीत आता 88 अतिरेकी संघटना झाल्या आहेत. कॅनडाचा क्रिमिनल कोड सांगतो की अतिरेकी संघटनांशी संपत्ती किंवा पैशांचा व्यवहार हा गुन्हा आहे. या संघटनेला आर्थिक मदत आणि बँकेची सेवा उपलब्ध करणे गुन्हा मानला जाणार आहे. गेल्या वर्षी RCMP ने दावा केला होता की भारत बिश्नोई गँगचा वापर कॅनाडात हत्या आणि खंडणी उकळल्यासाठी करतो आहे. खास करुन जे लोक खलिस्तानची मागणी करत आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी या गँगचा वापर होतो असा आरोप कॅनडाने केला होता. मात्र, नवी दिल्लीने हे आरोप फेटाळले होते. आणि भारत कॅनडासोबत मिळून या गँगच्या आर्थिक नाकेबंदी साठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.