हनीमूनला गेलेल्या इंदूरच्या राजाचा 2000 फूट खोल दरीत मृतदेह, पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे
पत्नीसोबत हनीमूनला गेलेल्या इंदूरच्या राजाचा 2000 फूट खोल दरीत एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे. अनेक रहस्य या प्रकरणात आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे झाले आहेत.

इंदूरचा राजा रघुवंशी हनीमून ट्रिप दरम्यान गायब झाला होता. तो शिलाँग येथे ट्रिपसाठी गेला होता. 11 दिवसाच्या शोध मोहिमेनंतर डोंगराळ भागात राजाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थित आढळला. त्याची पत्नी सुद्धा गायब आहे. पोलिसांनी खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच पोस्टमार्टम झालं. या रिपोर्टमधून मृत्यू दुर्घटना नसून हत्या असल्याच स्पष्ट झालय. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.
पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलीस सक्रीय झाले आहेत. हत्येच्या मागच कारण आणि मारेकऱ्याचा शोध सुरु आहे. राजा रघुवंशी पत्नीसोबत हनीमूनसाठी शिलाँगला गेला होता. अचानक दोघे बेपत्ता झाले. तपासादरम्यान शिलाँग पोलिसांनी या भागात ड्रोन आणि तीन टीम्सच्या माध्यमातून शोध मोहिम राबवली. ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरु असताना राजाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
हातावर राजा लिहिलेलं
पोलीस घटनास्थळी पोहोचले. 2000 फूट खोल दरीतून त्यांनी मृतदेह बाहेर काढला. हातावर राजा शब्द लिहिलेला त्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा झालाय की, राजाची हत्या करण्यात आली. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी अनेक वार करण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
विशेष टीम सुद्धा बनवली
या धक्कादायक घटनेनंतर शिलाँग पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. प्रत्येक अँगलने तपास सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणासाठी एक विशेष टीम सुद्धा बनवली आहे. या प्रकरणाता राजाची पत्नी कुठे आहे, त्या बद्दल काही समजलेलं नाही. त्यामुळे रहस्य आणखी वाढलय. नातेवाईक शिलाँग पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप करत आहेत. सुरुवातीला पोलिसांनी तपासात सहकार्य केलं नाही. फक्त दोन-तीन लोकांच्या माध्यमातून औपचारिक शोध घेतला असं नातेवाईकांच म्हणणं आहे.
मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांची 25 पेक्षा जास्त जवानांची टीम शोध मोहिमेला लावण्यात आली. त्यानंतर राजाचा मृतदेह मिळाला. शिलाँग पोलीस बेपत्ता पत्नीला कधी शोधून काढतात? त्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. त्यानंतरच सर्व रहस्य समोर येतील.
