AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जानू ऐक ना.. मला भेटायला…, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर तरुणीसोबत भयंकर घडलं!

एका तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. इन्स्टाग्रामच्या चॅटिंगमुळे ती मोठ्या संकटात सापडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जानू ऐक ना.. मला भेटायला..., आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर तरुणीसोबत भयंकर घडलं!
crime news (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Jun 04, 2025 | 9:25 PM
Share

सोशल मीडियावर मैत्री अनेकदा मोठ्या संकटात टाकते. महिला, तरुणींना तर वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं जातं. अनेक तरुणींना तर प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्यावर बलात्कारही केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असे असतानाच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर एका तरुणींसोबत भयंकर घडलं आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील रिवा येथे ही घटना घडली आहे. येथे एक तरुणी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका मुलाच्या संपर्कात आली होती. या मुलाचे नाव योगेश प्रताप सिंह असून तोच या प्रकरणातला आरोपी आहे. पीडित तरुणी आणि योगेश सिंह यांच्यात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर पीडित तरुणीने हॉटेलवर बोलवून योगेशने तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे एकदा नव्हे तर त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा पीडित तरुणीवर अत्याचार केला. पोलिसांनी रिवा येथून आरोपीला अटक केली आहे.

मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून घेतला शोध

पीडित तरुणी ही 26 मे रोजीपासून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी तिचा बराच शोध घेतला पण ती सापडली नाही. शेवटी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दिली. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास चालू केला. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांनी पीडित तरुणीने लोकेशन शोधले. त्यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत नेमकं काय घडलं? याची आपबीती सांगितली.

इन्स्टाग्रावर चॅटिंग, नंतर शोषण

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून योगेश प्रताप सिंहच्या संपर्कात आली. या दोघांमध्ये मोबाईलाच्या माध्यमातून संवाद व्हायचा. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला रिवा येथे हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने मुलीला चित्रकूट येथे नेलं. तिथेही त्याने तिच्यासोबत पुन्हा अत्याचार केला. अत्याचार करून तो तरुणीला तिथेच सोडून फरार झाला.

दरम्यान, पीडितेच्या कुटंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पकडण्यात आलंय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तसेच सोशल मीडियावर कोणाशीही चॅटिंग करताना योग्य ती काळजी घेतली घ्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.