पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट, कंपनीवर पोलिसांची कारवाई, एकाला अटक

या फसवणुकीची लिंक श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत पसरली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कंपनीचे लाखो रुपये गोठवले आहेत.

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट, कंपनीवर पोलिसांची कारवाई, एकाला अटक
| Updated on: Sep 26, 2023 | 12:19 PM

रतलाम| 26 सप्टेंबर 2023 : पैसे मिळवण्याचं वेड बहुतांश लोकांना असतं मात्र त्यापायी काही जण सारासार विचार न करता कोणताही मार्ग अवलंबतात. अवघ्या काही वेळात किंवा दिवसांत पैसे दुप्पट करण्यांच आश्वासन देऊन लोकांना ठकवणारे (fraud) अनेक भामटे असतात. एवढ्या सहज पैसे दुप्पट होत नाही हे माहीत असूनही अनेक लोकं त्या प्रलोभनांना बळी पडतात आणि मेहनतीची कमाई गमावतात. लोकांना फसवून असेच कोट्यवधी रुपये लुबाडणाऱ्या अशाच एका कंपनीविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या MTFE या बनावट आंतरराष्ट्रीय कंपनीविरोधात पोलिसांनी मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीच्या कारभारात अनेकांचे पैसे बुडाले होते. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी बंगळुरूमध्ये अटक केली आहे. या घोटाळ्यात रतलाम पोलिसांनी कालिन एंटरप्रायझेस या खासगी कंपनीचे संस्थापक योगानंद यांना बंगळुरू येथून अटक केली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या कंपनीत पैसा आला. एमईएफटीचे नटवरलाल हे पैसे हडप करायचे.

असे करायच फसवणूक

MTFE ॲप्लीकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून या ॲपमध्ये नोंदणी केली जाते. त्यामध्ये युजर्सना एक क्यूआर कोड आणि लिंक मिळ. Binance ॲपवर जाऊन (हे एक आंतरराष्ट्रीय कंपनीचे ॲप आहे जे बेकायदेशीर मानले जात नाही) डिपॉझिटच्या ऑप्शनवर लिंक पेस्ट केली तर ते पैसे थेट MTFE कंपनी पर्यंत पोहोचतात. या कंपन्यांमधून हा पैसा थेट नटवरलालांपर्यंत पोहचायचा.

कुठे पसरलं होतं जाळ

फसवणुकीचं हे जाळं फक्त देशातच नव्हे तर श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, अगदी सिंगापूर पर्यंत पसरलं आहे. रतलाम पोलिसांनी बायनॅन्स कंपनीचे (स्पेन) 39 लाख रुपये गोठवले आहेत. Binance हे एक आंतरराष्ट्रीय ॲप आहे ज्याद्वारे खासगी कंपन्यांच्या खात्यांमध्ये आणि या कंपन्यांमधून MEFT च्या घोटाळेबाजांकडे पैसे ट्रान्स्फर किंवा हस्तांतरित केले जातात. ही कोट्यवधी रुपयांची फसवणूक असून आत्तापर्यंत अनेकांनी पैसे गमावले आहेत. यामध्य गुंतवणूक करणाऱ्या लोकांना त्यांचे पैसे दुप्पट- तिप्पट करण्याचे आश्वासन दिले जात होते आणि त्यांना जाळ्यात फसवले जायचे. झटकन पैसा मिळवण्याच्या लोभाने अनेकडण यामध्ये रक्कम गुंतवायचे मात्र अखेरीस त्यांच्या हाती काहीच लागले नाही.