एकतर्फी प्रेमातून ‘तिची’ स्कूटी जाळली, स्कूटीची आग इमारतीत पसरली, 7 जणांचा होरपळून मृत्यू!

शुक्रवारी रात्री शुभम विजय नगरमध्ये तीन मजली इमारतीजवळ पोहोचला. स्कूटी जाळण्याच्या हेतूने आलेल्या शुभमने इमारतीच्या परिसरात असलेल्या तरुणीची स्कूटी पेटवली.

एकतर्फी प्रेमातून 'तिची' स्कूटी जाळली, स्कूटीची आग इमारतीत पसरली, 7 जणांचा होरपळून मृत्यू!
इंदूरमध्ये सात जणांना जिवंत जाळणाऱ्याला अटकImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 10:43 AM

इंदूर : एकतर्फी प्रेमामुळे (One sided love) तब्बल सात जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. इंदूरमध्ये ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणानं एका तरुणीची स्कूटी जाळली. या स्कूटीची आग (Scooty fire) जिथं तरुणीची स्कूटी होती, तिथल्या इमारतीत पसरली. आग इतक्या वेगानं पसरत गेली की संपूर्ण इमारत पेटली. इमारती पेटल्यानंतर एकच खळबळ उडाली. इमारतीतील लोकांचा जीव वाचवण्यासाठी आकांत सुरु झाला. पण दुर्दैवानं सात जण या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये होरपळळे आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे सुरुवातील इमारतीला आग लागली, इतकाच प्रकार सगळ्यांना माहीत होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासातून चक्क एकतर्फी प्रेमातून आगीची ही दुर्घटना घडून मोठा अनर्थ झाल्याचं निष्पन्न झालंय. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये (Indoor, Madhya Pradesh) घडली होती. आग लागल्याचं कळताच तत्काळ बचाव यंत्रणांना याबाबाबत माहिती देण्यात आली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेही. आगीवर नियंत्रणही मिळवण्यात आलं. मात्र तोपर्यंत सात जणांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झालेला.

नाव्याच्या बरोबर विरद्ध काम…

एकतर्फी प्रेमातून हे कृत्य करणाऱ्या तरुणाचं नाव शुभम दीक्षित आहे. शुभमचं ज्या मुलीवर प्रेम होतं, तिचं लग्न ठरलेलं. एकतर्फी प्रेमा आकंठ बुडालेल्या शुभमला राग अनावर झाला. त्यानं अखेर रागाच्या भरात जिच्यावर प्रेम केलं, त्या तरुणीची स्कूटी जाळण्याचं ठरवलं.

..आणि आग भडकली!

शुक्रवारी रात्री शुभम विजय नगरमध्ये तीन मजली इमारतीजवळ पोहोचला. स्कूटी जाळण्याच्या हेतूने आलेल्या शुभमने इमारतीच्या परिसरात असलेल्या तरुणीची स्कूटी पेटवली. स्कूटीनं पेट घेतल्यानंतर आग भडकली. इमारतीत पसरत गेली. संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. यानंतर आग इतकी वाढली, की संपूर्ण इमारतील अग्नितांडव निर्माण झालं. धुराचे लोट दूरवर पसरले.

सात जण होरपळले

या आगीनंतर एकच गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर गेली. आग वाढल्यानंतर बचावासाठी लोकांची धावपळ सुरु होती. मात्र आग वाढल्यानंतर अनेकजण होरपळले. सात जणांचा या आगीत मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. या तपासाच थक्क करणारी माहिती उघडकीस आल्यानंतर सगळेच जण चकीत झालेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.