औरंगाबादमध्ये महामार्गावर बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर बस रस्त्यावरच उलटली.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर-कन्नड रोडवर ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. शिउर बांगला परिसरातील वळणावर वळताना बस उलटली

बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गावरच बस उलटल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच हलकल्लोळ उडाला होता

अपघातात बसमधील 11 प्रवासी जखमी झाले. मात्र जखमी प्रवाशांची मदत करण्याऐवजी अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरुन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे

अपघातातील जखमी रुग्णांना कन्नड आणि वैजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही

अपघातातील जखमी रुग्णांना कन्नड आणि वैजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.