अपहरणकर्ता ऊसाच्या फडात लपला, धाडसी शेतकऱ्याने उभा फड जाळला, आरोपी कसा सापडला?

| Updated on: Feb 23, 2022 | 8:12 AM

ऊसतोड कामगाराच्या मुलीचं अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला. त्यामुळे अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडाला आग लावून त्याला जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे.

अपहरणकर्ता ऊसाच्या फडात लपला, धाडसी शेतकऱ्याने उभा फड जाळला, आरोपी कसा सापडला?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

औरंगाबाद : ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण (Kidnap) करणाऱ्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडालाच आग लावण्यात आली. औरंगाबादमध्ये (Aurangabad) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊस तोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात (Sugarcane Farm) लपला होता. त्यानंतर चक्क उभा ऊसाचा फड पेटवून देण्यात आला. अखेर आरोपीला अलगद जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे. बाबासाहेब दुबिले असं या धाडसी शेतकऱ्याचे नाव आहे. तर विष्णू उत्तम गायकवाड असं लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

ऊसतोड कामगाराच्या मुलीचं अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला. त्यामुळे अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडाला आग लावून त्याला जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे.

झोपलेल्या मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न

बाबासाहेब दुबिले असं या धाडसी शेतकऱ्याचे नाव आहे. विष्णू उत्तम गायकवाड असं लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास आरोपीने ऊसतोड कामगारांच्या गाडीत झोपलेल्या मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ऊसतोड कामगार गाडीकडे धावले.

त्यावेळी अपहरण करणाऱ्या आरोपीने धूम ठोकली आणि तो ऊसाच्या फडात धाव पळाला. तेव्हा ऊस मालकाने अख्ख्या ऊसाच्या फडला आग लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपहरण करणारा आरोपी अलगद जाळ्यात सापडला. त्यानंतर ऊसतोड कामगारांनी आरोपीचे हातपाय बांधून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

संबंधित बातम्या :

संबंधित बातम्या :

चित्रपट पाहून अपहरणाचा प्लॅन, रागाच्या भरात मित्रासोबत केलं भयंकर काम, दिल्लीमध्ये थरार

बहिणीला पळवून नेण्याची धमकी, फोनवरुन सतत त्रास; अखेर तरुणाने उचलले मोठे पाऊल, नेमकं काय केलं ?

मागाल ते देतो, काळजाच्या तुकड्याला सोडा, पुण्यातील अपहृत चिमुरड्याच्या वडिलांची भावनिक पोस्ट, नेटिझन्स हळहळले