Delhi Crime | चित्रपट पाहून अपहरणाचा प्लॅन, रागाच्या भरात मित्रासोबत केलं भयंकर काम, दिल्लीमध्ये थरार

खंडणीसाठी आपल्या मित्राचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याची दक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले असून पोलीस एकाचा शोध घेत आहेत. मृत तरुणाचे नाव रोहण असून तो 18 वर्षाचा होता. आरोपींनी बर्थ डे पार्टीच्या नावाखाली त्याला आपल्या सोबत नेले आणि त्याचे अपहरण करुन त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपयांची मागणी केली होती.

Delhi Crime | चित्रपट पाहून अपहरणाचा प्लॅन, रागाच्या भरात मित्रासोबत केलं भयंकर काम, दिल्लीमध्ये थरार
मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:20 AM

नवी दिल्ली : खंडणीसाठी आपल्या मित्राचे अपहरण(Kidnap) करुन त्याची हत्या केल्याची दक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले असून पोलीस एकाचा शोध घेत आहेत. मृत तरुणाचे नाव रोहन आहे तो 18 वर्षाचा होता. आरोपींनी बर्थ डे पार्टीच्या (Birthday Party) नावाखाली त्याला आपल्या सोबत नेले तसेच अपहरण करुन त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपयांची मागणी केली होती. या घटनेनंतर मित्रांनीच गळा दाबून हत्या केल्यामुळे नवी दिल्लीमध्ये (Delhi Crime) एकच खळबळ उडाली आहे. 23 जानेवारी 2022 रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला आहे.

चित्रपट पाहून मित्राचे अपहरण करण्याचा विचार

मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण रोहन आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गोपाळ नावाच्या त्याच्या मित्रासोबत घरातून निघून गेला होता. गोपाळ एका नामांकित शोरुमध्ये क्लिनरचे काम करतो. रोहन आपल्या वडिलांसोबत त्या शोरुममध्ये राहायचा. याच काळात रोहन आणि गोपाळ यांच्यात मैत्री झाली होती. दरम्यानच्या काळात गोपाळने एका चित्रपटात अपहरणाचा प्रसंग पाहिला. त्यानंतर आपणदेखील असे अपहरण करावे असा विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला. त्याने रोहनचेच अपहरण करण्यासाठी सापळा रचला. त्यासाठी त्याने आणखी दोन मित्रांची मदत घेतली. तसेच बर्थ डे पार्टीच्या नावाखाली गोपाळने रोहनचे अपहरण केले. पुढे त्याने रोहनच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपयांची मागणी केली.

रागाच्या भरात गळा दाबून हत्या 

दुसरीकडे मुलगा घरी न आल्यामुळे रोहनच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली होती. एकीकडे पोलीस अपहरण केलेल्या रोहनचा शोध घेत होते. तर दुसरीकडे आरोपीने 23 जानेवारी रोजी रोहनचे हात पाय बांधून अपहरण केले होते. अपहरणानंतर रोहन आणि गोापाळसोबत त्याचा वाद झाला. याच वादामध्ये रागाच्या भरात गोपाळ आणि त्याच्या दोन साथिदारांनी रोहनचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतरदेखील आरोपी रोहनच्या कुटुंबीयांना खंडणी म्हणून दहा लाख रुपये मागत होते.

लोकेशन चेंज करुन विचलित करण्याचा प्रयत्न

दरम्यान, 23 जानेवारी रोजी रोहनचे अपहरण करुन आरोपी गोपाळ नेहमीप्रमाणे शोरुममध्ये कामासाठी गेला होता. येथे पोलीस रोहनचा शोध घेत असल्याचे समजल्यावर त्याने खंडणीचा नाद सोडला. तसेच स्वत:चा बचाव करण्यासाठी खटाटोप सुरु केला. तीन आरोपींपैकी एकाने गोपाळचा मोबाईल घेतला. तसेच लोकेशन सतत बदलले दिसावे म्हणून तो मोबाईलसह वेगवेगळ्या ठिकाणी फिरु लागला. पोलिसांनी गोपाळच्या मोबाईलचे लोकेशन मोरादाबाद येथे ट्रेस केले होते. आरोपी पोलिसांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी गोपाळ तसेच त्याचा मित्र सुशील यांना अटक केलं आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

इतर बातम्या :

Gondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु

Borivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या

येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.