AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु

गोंदिया शहराला लागून असलेल्या कटंगी गावाजवळ अज्ञात आरोपीने त्यांना एका दुचाकी वाहनावरून येत रस्त्यात अडवत त्यांच्यावर गोळीबार केला. हा गोळीबार छऱ्या वाल्या बंदुकीने केल्याने भुरले यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Gondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 12:22 AM
Share

गोंदिया : एका सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार (Firing) केल्याची घटना गोंदिया शहरात आज घडली आहे. या हल्ल्यात सामाजिक कार्यकर्ता जखमी झाले असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धनेंद्र भुरले (Dhanendra Bhurale) असे हल्ला करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. गोळीबारात भुरले यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गोंदियातील जेष्ठ समाजसेविका सविता बेदरकर भुरले यांचे धनेंद्र भुरले हे पती आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Firing on a social worker in Gondia, The injured are being treated at the district general hospital)

शेतावरुन घरी येत असताना भुरलेंवर हल्ला

गोंदिया शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भुरले यांच्या शेतावर अनाथालयाचे बांधकाम सुरु आहे. धनेंद्र भुरले हे बांधकामाच्या ठिकाणी होते. भुरले यांना शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ते कुठे आहेत अशी विचारणा केली. यावर भुरले यांनी मी शेतावरून घरी परत येत आहे अशी माहिती फोन वरून दिली. यानंतर गोंदिया शहराला लागून असलेल्या कटंगी गावाजवळ अज्ञात आरोपीने त्यांना एका दुचाकी वाहनावरून येत रस्त्यात अडवत त्यांच्यावर गोळीबार केला. हा गोळीबार छऱ्या वाल्या बंदुकीने केल्याने भुरले यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

इगतपुरीत गँगवारमध्ये एक ठार, एक जखमी

पूर्ववैमनस्यातून नाशिकमधील इगतपुरी शहरात दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. राहुल साळवे असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर इगतपुरी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या मारामारी दरम्यान तीन चारचाकी आणि पाच मोटरसायकलींचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाच घरांवरही दगडफेक करण्यात आली. गुरुवारी नांदगाव सदो गावात एका गटाची भांडणे झाली होती. याच भांडणातून शुक्रवारी राडा झाल्याचे कळते. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. हाणामारीचा सीसीटीव्ही फुटेज किंवा मोबाईल व्हिडिओ कुणाकडे असल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागिरकांना केले आहे. (Firing on a social worker in Gondia, The injured are being treated at the district general hospital)

इतर बातम्या

Borivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या

Mumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.