
औरंगाबाद शहरात एका कारमध्ये स्फोट झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. या स्फोटात कारमधील दोघा जणांना प्राण गमवावे लागले.

औरंगाबाद शहरातील गंधेली भागात चारचाकी वाहनात स्फोट झाला. परिसरातील निर्जन स्थळी ही गाडी थांबवली होती.

कारमधील स्फोटात एका जोडप्याचा मृत्यू झाला. स्फोटात गाडीचे छत पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की एक महिला आणि एका पुरुषाचा जागीच जळून मृत्यू झाला.

निर्जन जागी थांबलेल्या गाडीत हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा अपघात होता की दोघांनी स्फोट घडवला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

स्फोटाच्या घटनेची माहिती मिळताच औरंगाबादमधील चिखलठाण ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा स्फोट कशामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे