अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तुरुंगात, जामिनावर सुटताच पुन्हा तिच्यावरच बलात्कार, पीडितेची प्रसुती

लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेला आरोपी मयुर रमेश कोळी (वय 21 वर्ष) याने तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तुरुंगात, जामिनावर सुटताच पुन्हा तिच्यावरच बलात्कार, पीडितेची प्रसुती
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 7:00 AM

जळगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेल्या आरोपीने तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच मुलीवर अत्याचार (Minor Girl Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील (Jalgaon) एका गावात ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 21 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. या प्रकरणात अटक झाल्यानंतर आरोपीची रवानगी तुरुंगात झाली. नुकताच तो जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा त्याच पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे. यातून गर्भवती राहिलेल्या पीडितेची प्रसुतीही झाली. परंतु सात महिन्यांच्या कालावधीनंतर बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अखेर आरोपीवर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेला आरोपी मयुर रमेश कोळी (वय 21 वर्ष) याने तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंध प्रस्थापित करुन आणि लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. जळगावातील जामनेर पोलिसात या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध गुन्हाही दाखल आहे.

पीडितेची प्रसुती

या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आरोपीची रवानगी तुरुंगात झाली. जामिनावर सुटल्यानंतर संशयित आरोपीने पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिची प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

दरम्यान, अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या सात महिन्यांच्या मुलीचा नुकताच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित मयुर कोळी या तरुणा विरोधात पुन्हा सोमवारी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातील ही घटना आहे.

संबंधित बातम्या :

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह ठरला, नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर बलात्कार

अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप