AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Biyani | गोळीबारात गंभीर जखमी बिल्डरचा मृत्यू, संजय बियाणींच्या हत्येने नांदेडमध्ये खळबळ

नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते.

Sanjay Biyani | गोळीबारात गंभीर जखमी बिल्डरचा मृत्यू, संजय बियाणींच्या हत्येने नांदेडमध्ये खळबळ
संजय बियाणीImage Credit source: टीव्ही9
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 05, 2022 | 1:31 PM
Share

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील  घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं (Firing) कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्यावर गोळी झाडून कोणी हल्ला केला, हे अजूनही समजलेलं नाही. बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती, मात्र तेव्हा पुरवलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघा जणांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र संजय बियाणी यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.

संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा गोळीबार कुणी केला याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे.

तीन महिन्यांपूर्वीच सुरक्षा काढली

विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदा यांने खंडणीसाठी धमकी दिली होती, तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, तीन महिन्यांपूर्वीच संजय बियाणी यांच्यासह 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती.

नांदेडमध्ये घबराट

दरम्यान, गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे, का याचा शोध पोलीस घेत आहेत. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा वापर वाढल्याचं चित्र आहे. गोळीबाराच्या घटना सर्रास घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.

संबंधित बातम्या :

Sanjay Biyani | नांदेडमध्ये प्रसिद्ध बिल्डरवर गोळीबार, संजय बियाणी गंभीर जखमी

बायकोला Video Call करुन जवानाची आत्महत्या, बायकोनेही स्वतःला पेटवलं, मोठ्या भावाला हार्ट अटॅक

विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये Gang War, गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?