Sanjay Biyani Murder | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येने पालकमंत्रीही अस्वस्थ, अशोक चव्हाण बियाणी कुटुंबाच्या भेटीला

| Updated on: Apr 07, 2022 | 12:48 PM

मंगळवार 5 एप्रिल 2022  रोजी सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील  घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या.

Sanjay Biyani Murder | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येने पालकमंत्रीही अस्वस्थ, अशोक चव्हाण बियाणी कुटुंबाच्या भेटीला
अशोक चव्हाण हे बियाणी कुटुंबीयांच्या भेटीला
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नांदेड : नांदेडमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. संजय बियाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी बियाणी कुटुंबाची भेट घेतली. नांदेड विभागाचे आयजी, एसपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन मंत्री चव्हाण यांनी बियाणी कुटुंबीयांशी चर्चा केली. या भेटीत बिल्डर संजय बियाणींच्या हत्येमागचे काही धागेदोरे मिळतात का, याची चाचपणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बियाणी यांच्या हत्येने पालकमंत्री स्वतः प्रचंड अस्वस्थ झाले असून या हत्येचा तातडीने तपास लावण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेडमधील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मंगळवार 5 एप्रिल 2022  रोजी सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील  घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा कार चालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांची प्राणज्योत मालवली.

सीसीटीव्हीत हल्ल्याची दृश्यं कैद

संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज अवघ्या काही तासातच समोर आले होते. गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्हीत कैद दिसत होतं. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्यावर कोणी हल्ला केला, हेही अजून समजलेलं नाही.

बियाणींची हत्या खंडणीसाठी?

संजय बियाणी हे नांदेडमधले बडे प्रस्थ असून खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संजय बियाणी यांना बांधकाम व्यवसायातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागल्याने खंडणीखोरांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या.

संजय बियाणी कोण होते?

संजय बियाणी नांदेडच्या नायगांव तालुक्यातील कोलंबी गावातील रहिवासी होते.  त्यांनी सुरुवातीला केबल व्यवसायातून कारकीर्द सुरु केली. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवलं. नांदेडकरांना कमी किमतीत फ्लॅट देणारे बिल्डर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. साधारणतः पंधरा वर्षांपासून ते या व्यवसायात सक्रिय होते. अगदी गेल्याच आठवड्यातच त्यांनी आपल्या समाजातील 73 कुटुंबाना स्वस्त किमतीत घरे दिल्याने ते चर्चेत आले होते.

पाहा गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Sanjay Biyani | बिल्डर संजय बियाणींचे पार्थिव पाहताच पत्नीचा टाहो, हत्येबाबत मोठा आरोप

Sanjay Biyani Firing CCTV | बिल्डर संजय बियाणींची हत्या, गोळीबाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर

दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?