AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडच्या नर्सिंग कॉलेज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीचे रॅगिंग, वसतिगृह अधीक्षकांसह तिघी जणींवर गुन्हा

नांदेड जिल्ह्यातील हदगावमधील नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीवर रॅगिंग करण्यात आली होती. या प्रकरणी पीडित मुलीने वसतिगृह अधीक्षकांकडे तक्रार केली असता, त्याने हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.

नांदेडच्या नर्सिंग कॉलेज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीचे रॅगिंग, वसतिगृह अधीक्षकांसह तिघी जणींवर गुन्हा
नांदेडमधील नर्सिल स्कूल हॉस्टेलमध्ये रॅगिंग
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 10:05 AM
Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगावमधील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर रॅगिंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन सिनियर विद्यार्थिनींनी नव्याने अॅडमिशन घेतलेल्या मुलीचा कॉलेजमध्ये येताच छळ केल्याचा आरोप आहे. तक्रारदार विद्यार्थिनीला विवस्त्र होऊन झाडू मारण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याची तक्रार तिने शिक्षकाकडे केल्यानंतर त्यानेही तिला धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वसतिगृह अधीक्षकांसह तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीवर रॅगिंग

नांदेड जिल्ह्यातील हदगावमधील नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीवर रॅगिंग करण्यात आली होती. या प्रकरणी पीडित मुलीने वसतिगृह अधीक्षकांकडे तक्रार केली असता, त्याने हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वसतिगृह अधीक्षक आणि तीन जणींवर पोलिसांनी रॅगिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

कपडे काढ, नाक घास, झाडू मार असे म्हणत कपडे काढण्यास भाग पाडल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. तर भगीरथ शिंदे या शिक्षकाने तू हलक्या जातीची आहेस, तुझे शैक्षणिक नुकसान करतो, असे धमकावल्याचा आरोप मुलीने केलाय. हदगाव सारख्या छोट्या शहरात देखील रॅगिंगचे लोण पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षकांच्या बाजूने विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

तर दुसरीकडे याच वसतिगृह आणि कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांनी मात्र शिक्षकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आहे. आरोपी असलेले शिंदे सर हे निर्दोष असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाजूंनी तपास अद्याप बाकी असून त्यांनतरच यावर भाष्य करता येईल असे पोलिसांनी सांगितले.

नाशिकमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

दरम्यान, नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली होती. मृत डॉक्टरच्या कुटुंबाने रॅगिंगमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे असं या मृत डॉक्टरचं नाव होतं. तो गायनॉकॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिंदे कुटुंबाने रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर कॉलेज प्रशासनाने मात्र, कुटुंबाच्या आरोपांचं खंडण केलं होतं.

संबंधित बातम्या :

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरचा मृत्यू? अमित देशमुखांचे चौकशीचे आदेश

रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची नायर रुग्णालयात आत्महत्या

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.