नाशिकमध्ये 24 वर्षीय तरुणाची हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्येचा संशय

पूर्ववैमनस्यातून किंवा वर्चस्वाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 24 वर्षीय तरुणाच्या हत्तेने म्हसरूळ परिसर हादरला आहे.

नाशिकमध्ये 24 वर्षीय तरुणाची हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्येचा संशय
नाशिकमध्ये तरुणाची हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:06 AM

नाशिक : 24 वर्षीय तरुणाची हत्या (Youth Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या म्हसरूळ (Nashik Crime News) परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोटात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून (Old Rivalry) किंवा वर्चस्वाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 24 वर्षीय तरुणाच्या हत्येने म्हसरूळ परिसर हादरुन गेला आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकच्या म्हसरुळ परिसरात असणाऱ्या सावकार गार्डन जवळ एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यश रामचंद्र गांगुर्डे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. तर त्याच्या मित्राने तिथून वेळीच पळ काढल्याने तो बचावला.

हे सुद्धा वाचा

पूर्ववैमनस्यातून हत्येचा संशय

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. तर पूर्ववैमनस्यातून किंवा वर्चस्वाच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे.

पंचवटीत बापलेकाचा गळफास

दुसरीकडे, नाशिकच्या पंचवटी परिसरात वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन दोघांनी आयुष्याची अखेर केली. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असं वडील-मुलाचे नाव आहे. दुहेरी आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याआधी अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाने मेव्हण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्येच समोर आला होता. लासलगाव-मनमाड रोडवर अनिले अहिरे नामक व्यक्तीचा खून झाला होता. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन भावोजींनी मेव्हण्याचा (साल्याचा) खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मयत तरुणाचा मेव्हणा दत्तात्रय अहिरे याला बेड्या ठोकल्या आहेत. महामार्गालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात संशयित मारेकरी आणि मयत एकाच दुचाकीवरुन आल्याचे दिसले. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.