झोपलेल्या आईचा खून, मृतदेह गादीसकट झुडपात टाकला, नराधम पोराचा बार्शीहून मुंबईला पोबारा

| Updated on: Oct 13, 2021 | 9:29 AM

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 वर्ष, रा. वाणी प्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21 वर्ष) असं आईच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

झोपलेल्या आईचा खून, मृतदेह गादीसकट झुडपात टाकला, नराधम पोराचा बार्शीहून मुंबईला पोबारा
बार्शीत महिलेची हत्या, मुलावर संशय
Follow us on

सोलापूर : जन्मदात्या मुलाने झोपलेल्या जागीच डोक्यात दगड घालून आईचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृतदेह गादीवरुन ओढत घराबाहेर आणून झुडपात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत उघडकीस आली आहे.

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 वर्ष, रा. वाणी प्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21 वर्ष) असं आईच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

प्लास्टिक कागदामध्ये महिलेचा मृतदेह

बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथील शिंदे यांच्या घरी फावडे मायलेक राहत होते. त्यांच्या घराच्या कपाऊंडमध्ये एका प्लास्टिक कागदामध्ये महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

मायलेकाचे वाद

मयत महिला रुक्मिणी आणि तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे हे दोघे जण तिथे राहत होते. लहान मुलगा आणि पती हे नेहमी भांडण होत असल्याने बार्शी शहरातील डंबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. मोठा मुलगा आणि रुक्मिणी यांच्यात पैशावरुन नेहमी वाद होत होते. त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारीही दाखल होत्या.

मुलगा मुंबईला गेल्याची माहिती

मयत महिलेचे पती नागनाथ फावडे आणि त्यांचा लहान मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेस्टसवरुन समजले, असे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरते कपडे त्याने नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यापूर्वीही त्याने आई आणि धाकट्या भावाला मारहाण केल्याने रुक्मिणी फावडेंची हत्या मोठा मुलगा श्रीराम फावडे यानेच डोक्यात दगड घालून केल्याचा संशय आहे. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

नागपुरात भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास

दुसरीकडे, भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घर मालकाने गळफास घेतला. नागपूरमधील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी घरमालकाने व्हिडीओ तयार केला होता. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला.

काय आहे प्रकरण?

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कस्तुरबा नगर परिसरात मुकेश रिझवानी यांचे घर आहे. 2019 साली ज्यावेळी कोरोना नागपूरमध्ये धुमाकूळ घालत होता, त्यावेळी घर मालक मुकेश रिझवानी यांनी राजेश सेतीया नामक इसमाला घराच्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या.

घरमालकाला जीवे मारण्याची धमकी 

या काळात राजेश सेतीया यांनी घर मालक मुकेश रिझवानी यांना घर भाडे देणे अपेक्षित होते, मात्र ज्यावेळी मुकेश हे राजेश सेतीया यांच्याकडे घरभाडे मागण्यासाठी गेले तेव्हा राजेश सेतीया आणि त्याचा भाऊ मूलचंद सेतीया यांनी मुकेश रिझवानी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

घर रिकामं करण्यासाठी साडेचार लाखांची मागणी

आरोपी भाडेकरु राजेश सेतीया हा मुकेश यांना वारंवार धमकी देत होता. घर रिकामे करून हवे असले तर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपी सेतीया याने मुकेश यांच्याकडे केली. घर रिकामे झाल्यास कायमची कटकट सुटेल म्हणून मुकेश रिझवानी यांनी सेतीयाला काही पैसेही दिले. मात्र, त्यानंतर आरोपी राजेश सेतीयाने घर रिकामे करण्याऐवजी आणखी पैसे मागितले.

भाडेकरुकडून सुरु असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी भाऊ फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

भाडेकरुवर आरोप, व्हिडीओ व्हायरल

घरमालक मुकेश यांना भाडेकरु राजेश सेतीया हा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता, त्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक दडपणाखाली वावरत होते. राजेश घर रिकामे करत नसल्याने मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यापूर्वी मुकेश यांनी एक व्हिडीओ तयार केला, ज्यामध्ये त्यांनी भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा सांगून तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.

संबंधित बातम्या :

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

पिंपरीतील कुख्यात रावण टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या, साताऱ्यातून सहा जणांना बेड्या

पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, नाशकात पाच जण अटकेत