AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दोघांना फ्रीस्टाईल मारहाण, ऑफिसबाहेरच राडा

बँकेच्या भोसले नामक व्यवस्थापकाने शिवीगाळ केल्यामुळे जाब विचारण्यास गेलेल्या दोघा नागरिकांना स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे

VIDEO | स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दोघांना फ्रीस्टाईल मारहाण, ऑफिसबाहेरच राडा
सोलापुरात कर्मचाऱ्यांची दोघांना मारहाण
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 21, 2021 | 1:03 PM
Share

सोलापूर : सोलापुरात एका स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने दोघा जणांना फ्री स्टाईल मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्ज प्रकरणाची फाईल देणाऱ्या नागरिकांना त्याने भर चौकात मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

बँकेच्या भोसले नामक व्यवस्थापकाने काल रात्री शिवीगाळ केल्यामुळे जाब विचारण्यास गेलेल्या नागरिकांना स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. स्मॉल फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या बाहेरच फ्री स्टाईल मारहाण करण्यात आली. कर्ज घेण्यास आलेल्या दोघा नागरिकांना बेदम मारहाण केली. अमर बोडा आणि चंद्रशेखर बोडा अशी मारहाण झालेल्या नागरिकांची नावं आहेत.

पाहा व्हिडीओ :

राम भोगलेंच्या कंपनीत गुंडगिरी

दरम्यान, औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.

काय घडलं होतं?

आमच्या कारखान्यातील एका कामगाराने डायल्युटेड सोप वाटर प्यायलं होतं. त्यानंतर आम्ही त्या कामगाराला रुग्णालयात भरती केलं, मात्र त्यानंतर आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने आमच्या कंपनीचे सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. यानंतर पोलीस येतायत म्हटल्यानंतर या सगळ्यांनी पळ काढला पण असे प्रकार सातत्याने आणि उद्योगात सर्वत्र घडत आहेत. त्यामुळे उद्योजकांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं राम भोगले या प्रकारानंतर म्हणाले होते.

उद्योगपतीची कामगाराला मारहाण

दरम्यान, उद्योगपतीनेच कामगाराला मारहाण केल्याचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. औरंगाबादमधील एमआरए लॉजीस्टिक कंपनीच्या मालकाने कामगाराला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘काम का देत नाही?’ असं विचारायला गेलेल्या कामगाराला मालकाने मारहाण केल्याचा आरोप झाला होता. राजू फकिरचंद हिरेकर असं मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर मुकेश शरावत असं मारहाण करणाऱ्या कंपनी मालकाचे नाव आहे. मारहाण प्रकरणी कामगाराने औरंगाबादमधील वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगून खंडणीवसुली, औरंगाबादमध्ये दादागिरी करणारे दोघे रंगेहाथ

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

VIDEO | काम का देत नाही? प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कंपनी मालकाकडून चोप

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली