Double Murder | सासू-मेहुणीवर कोयत्याने वार, वाशिममध्ये जावयाकडून दुहेरी हत्या

सासुरवाडीला जाऊन जावयाने बायकोच्या माहेरच्या मंडळींची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासूबाई आणि मोठ्या मेहुणीवर जावयाने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.

Double Murder | सासू-मेहुणीवर कोयत्याने वार, वाशिममध्ये जावयाकडून दुहेरी हत्या
वाशिममध्ये दुहेरी हत्या
Image Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 11:01 AM

वाशिम : नवऱ्याने बायकोच्या माहेरच्या माणसांवर हल्ला (Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासू आणि मोठ्या मेहुणीवर जावयाने हल्ला केला. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार (Washim Crime News) इथे ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जावयाने सासूबाई आणि मेहुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघीही जणींना प्राण गमवावे (In laws Murder) लागले आहेत. निर्मला पवार आणि विजया गुंजावळे अशी मयत महिलांची नावं आहेत. संपत्तीच्या वादातून या दुहेरी हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

सासुरवाडीला जाऊन जावयाने बायकोच्या माहेरच्या मंडळींची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासूबाई आणि मोठ्या मेहुणीवर जावयाने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार इथे जावयाने दोघी जणींवर कोयत्याने वार केल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात दोघीही जणींचा मृत्यू झाला.

संपत्तीच्या वादातून हत्येचा संशय

संपत्तीच्या वादातून निर्मला पवार आणि विजया गुंजावळे या मायलेकीची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.