AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्ह इन पार्टनरला मारून चादरीत गुंडाळला मृतदेह, 2 दिवस शेजारीच झोपला.. सनकी प्रियकरामुळे खळबळ

एकमेकांच्या प्रेमात पडून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यामधील घरगुती वादाने भयानक वळण घेतले. मद्यधुंद अवस्थेत प्रियकर सचिन राजपूतने त्याची प्रेयसी रितिका सेन हिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह घरात लपवून ठेवला. 2 दिवस तो तिच्या मृतदेहाशेजारीच झोपत होता. अखेर तीन दिवसांनी त्याने दोस्ताला फोन केला आणि.. कुठे घडली ही भयानक घटना ?

लिव्ह इन पार्टनरला मारून चादरीत गुंडाळला मृतदेह, 2 दिवस शेजारीच झोपला.. सनकी प्रियकरामुळे खळबळ
सनकी प्रियकरामुळे माजली खळबळImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 01, 2025 | 9:50 AM
Share

भोपाळच्या बजरिया पोलीस स्टेशन परिसरातील एका लिव्ह-इन जोडप्यामध्ये घरगुती कारणावरू वाद झाला, मात्र पाहता पाहता त्या वादाला भयानक वळण लागलं. मद्यधुंद अवस्थेत, प्रियकर सचिन राजपूतने त्याची प्रेयसी रितिका सेन हिचा गळा दाबून खून केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने मृतदेह चादरीत गुंडाळला आणि तो घरातच लपवून ठेवला. ही हत्या झालीतेव्हा आरोपी हा दारूच्या नशेतच होता. दोन दिवस तो प्रेयसीच्या मृतदेहासोबतच घरात वावरत होता, त्या शेजारीच झोपत होता. अखेर तीन दिवसांनी त्याने त्याच्या मित्राला आपल्या या गंभीर गुन्ह्याबद्दल सांगितल्यानंतर तो मित्र हादरलाच. त्याने कसाबसा पोलिसांना फोन लावला आणि अखेर या भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन राजपूतने त्याची लिव्ह-इन पार्टनर रितिका सेन हिचा गळा दाबला आणि तिचा जीव घेतला. घटनेच्या वेळी तो नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सचिनने तब्बल 3 दिवसांनी दिवसांनी त्याच्या मित्राला संपूर्ण घटनेबद्दल सांग गुन्हा तबूल केला. हे ऐकून त्याचा मित्र सटपटलाच, त्याने पोलिसांना फोन करत या घनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीची लिव्ह इन पार्टनर असलेली रितीका सेनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

दोन रात्री मृतदेहाच्या शेजारीच झोपला

28 ते 29 जूनच्या मध्यरात्री आरोपीने रितिकाची हत्या केली. हत्येनंतर, आरोपी सचिनने रितिकाचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि तो तसाच खोलीत सोडून तो घटनास्थळावरून पळून गेला. नशा उतरल्यानंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने त्याच्या एका मित्राला हे भयानक कृत्य सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच मित्राने लगेचच पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सचिन राजपूतला अटक केली. सचिन आणि रितीका हे दोघेही काही काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

पोलिसांकडून तपास सुरू

सचिन आणि रितिका सुमारे साडेतीन वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघेही विदिशा जिल्ह्यातील सिरोज येथील रहिवासी आहेत, असे बजरिया पोलिस स्टेशनच्या प्रभारी शिल्पा कौरव यांनी सांगितले. सचिन व रितीका सुमारे 10 महिन्यांपासून बजरिया परिसरात राहत होते. हत्येच्या दिवशी त्या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून तरी वाद झाला होता. या वादानंतर सचिनने रितिकाचा गळा दाबून खून केला आणि तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.