बापाकडून मुलीच्या बलात्काराचा बदला, एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील चक्क सहा जणांची हत्या केली (man killed six people of same family for avenges his girl rape).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:20 PM, 15 Apr 2021
बापाकडून मुलीच्या बलात्काराचा बदला, एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या

अमरावती : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील चक्क सहा जणांची हत्या केली. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. आरोपीने सहा जणांची हत्या करुन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मुलीच्या बलात्काराचा बदला म्हणून आपण हे कृत्य केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे (man killed six people of same family for avenges his girl rape).

पोलिसांकडून आरोपीला अटक

संबंधित घटना ही विशाखापट्टणम येथील जट्टादा गावात घडली आहे. या गावातील एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा जीव घेतला. या घटनेनंतर आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. आरोपीची सध्या चौकशी सुरु आहे (man killed six people of same family for avenges his girl rape ).

मुलीच्या बलात्काराचा बदला

दोन्ही कुटुंबांमध्ये शत्रूत्व होतं. मृतक कुटुंबातील एका व्यक्तीने आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला होता, असा दावा त्याने केला आहे. त्यातून त्याने इक्या लोकांच्या हत्या केल्या, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, ज्या व्यक्तीने बलात्कार केला होता तो सध्या फरार आहे. त्याने बलात्कार केल्याची माहिती आरोपीला कळताच त्याला प्रचंड संताप आला. त्याचा स्वत:वरील संयम सुटला आणि त्याने सहा जणांची हत्या केली.

आरोपीकडून शस्त्र जप्त

ही घटना ज्या भागात घडली त्या भागात खळबळ उडाली आहे. आरोपीने लहान मुलांनाही न सोडल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केला जातोय. दरम्यान, आरोपीने ज्या धारधार शस्त्रांनी सहा जणांची हत्या केली ते शस्त्र जप्त केलं आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

आरोपीन दोन महिला, लहान मुलं आणि एका पुरुषाची निर्दयीपणे हत्या केली आहे. त्यांच्या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत माजली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

हेही वाचा : टरबुजातून तंबाखू आणि दारु, कोरोनाग्रस्तांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांची शक्कल