Aurangabad Crime | आणखी एक खून, गुंप्तांग जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादेत चाललंय काय ?

नुकताच शहरातील व्यवसायिक हसन साजेद पटेल यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे. मात्र आता औरंगाबाद (Aurangabad) शहरात हादरवून टाकणारा आणखी एक खून (Murder) झाला आहे. औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर परिसरामध्ये एका मैदानात 36 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणने खून करण्यात आला आहे.

Aurangabad Crime | आणखी एक खून, गुंप्तांग जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादेत चाललंय काय ?
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 2:29 PM

औरंगाबाद : नुकताच शहरातील व्यवसायिक हसन साजेद पटेल यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे. मात्र आता औरंगाबाद (Aurangabad) शहरात हादरवून टाकणारा आणखी एक खून (Murder) झाला आहे. शहरातील टीव्ही सेंटर परिसरामध्ये एका मैदानात 36 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणने खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खून करुन या तरुणाचे गुप्तांप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या विचित्र खुनामुळे औरंगाबाद शहर हादरले आहे.

खून करुन गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न 

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मैदानात तरुणाचा 36 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. दगडाने ठेचून त्याला संपवण्या आलं. तसेच आग लावून त्याचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. तब्बल 48 तासांपूर्वी खून झाला असून आता हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

जानेवारी महिन्यात खुनाची तिसरी घटना 

tv सेंटर परिसरात असलेल्या मैदानावरील स्टेडीयमच्या अंडरग्राउंडमध्ये एका अंधाऱ्या खोलीमध्ये हा खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. 48 तासांनंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलं आहे. तसेच आरोपींचा शोधाशोध सुरू केला आहे. औरंगाबाद शहरात जानेवारीच्या पहिल्या महिन्यात ही खुनाची तीसरी घटना असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या :

Pune crime | कौमार्य चाचणी भंग केल्याचा ठपका ठेवत अमेरिकास्थित उच्चशिक्षित पतीकडून पत्नीचा छळ

Latur Crime | पती जिवंत असताना केलं अजब काम, लातूरमध्ये संपत्ती लाटण्यासाठी पत्नीचा गजब कारनामा

Madhya Pradesh Robbers case| जखमी पोलीस कर्मचारी शुभम कदम यांची पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घेतली भेट