Latur Crime | पती जिवंत असताना केलं अजब काम, लातूरमध्ये संपत्ती लाटण्यासाठी पत्नीचा गजब कारनामा

Latur Crime | पती जिवंत असताना केलं अजब काम, लातूरमध्ये संपत्ती लाटण्यासाठी पत्नीचा गजब कारनामा
सांकेतिक छायाचित्र

संपत्ती लाटण्यासाठी पत्नीने पतीचे थेट मृत्यूपत्र काढल्याचा धक्कादायक प्रकार उदगीर (Udgir) नगरपालिकेत घडला आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता शासकीय अधिकाऱ्यांपासून (Government Officer) ते सरकारी यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

महेंद्र जोंधळे

| Edited By: prajwal dhage

Jan 21, 2022 | 12:24 PM

लातूर : संपत्ती लाटण्यासाठी पत्नीने पतीचे थेट मृत्यूपत्र काढल्याचा धक्कादायक प्रकार उदगीर (Udgir) नगरपालिकेत घडला आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता शासकीय अधिकाऱ्यांपासून (Government Officer) ते सरकारी यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पत्नी मागील काही दिवसांपासून आपल्या पतीपासून विभक्त झालेली होती. या प्रकरणात पत्नी आणि नगरसेवकासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं ?

उदगीर नगर पंचायतीच्या हद्दीत परमेश्वर केंद्रे यांचे घर आहे. मात्र मागील काही दिवसांपासून ते आपली पत्नी राजश्री केंद्रे यांच्यापासून विभक्त राहतात. याच विभक्त असलेल्या पत्नीने आपल्या पतीची संपत्ती हडपण्यासाठी मोठा कट रचला. या महिलेले आपला पती जिवंत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवत उदगीर नगरपंचायतीमधून पतीच्या नावाचे मृत्यूपत्र काढले. वारसा प्रमाणपत्र काढण्यासाठी या महिलेने पतीचा म्हणजेच परमेश्वर केंद्रे यांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला.

पत्नीचे बिंग फुटले, सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

मात्र हा प्रकार समोर आल्यामुळे या महिलेचे बिंग फुटले. तसेच या प्रकरणात पत्नी राजश्री केंद्रे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजश्री यांच्यासोबतच नगरसेवकासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

त्याने माझ्यावर 25 वार केले होते, मी संधी मिळताच 36 वार केले, औरंगाबादेत हसन पटेल हत्याकांडात खळबळजनक कबुली!

vasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप

आर्वी गर्भपात प्रकरणात अखेर पीसीपीएनडीटी कमिटीला जाग, तब्बल 260 तासांनी तक्रार, नियमांचा विसर?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें