AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या

Crime News : मृतदेहाजवळ घरातील कुठल्या सदस्याची पिस्तुल आढळली? पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित आहे. केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या घरात ही हत्या झाली. मृत विनय केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाचा मित्र आहे.

धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या
vinay Srivastava
| Updated on: Sep 01, 2023 | 11:08 AM
Share

लखनऊ : केंद्रीय राज्यमंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कौशल किशोर हे उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज जागेवरुन लोकसभा खासदार आहेत. त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी एका युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवकाची ओळख पटवण्यात आली असून त्याच नाव विनय श्रीवास्तव आहे. विनय हा कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोरचा मित्र आहे. तो घरी त्यांच्यासोबतच रहायचा. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक पिस्तुल जप्त केली आहे. या पिस्तुलच लायसन्स आहे. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचं बेगरिया गावात घर आहे. ठाकूरगंज पोलीस ठाणे क्षेत्रात हे गाव येतं. बेगरियामधील गावात कौशल किशोर यांच्या घरात ही घटना घडली आहे.

विनय श्रीवास्तवची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पश्चिमचे डीसीपी राहुल राज, ADCP चिरंजीव नाथ सिन्हा यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केलीय. लखनऊ DCP पश्चिमी राहुल राज यांनी सांगितलं की, गोळी लागल्यामुळे विनय श्रीवास्तवचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यावरही जखम होती. रात्री 6 लोक आले होते. घरी खाणं-पिणं झालं. त्यानंतर गोळी झाडण्याची घटना घडली. ही पिस्तुल विकास किशोरची असल्याच म्हटलं जातय. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम तपास करतेय. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटजेही तपासल जातय. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय.

कौशल किशोर यांनी काय सांगितलं?

मंत्री आणि खासदार कौशल किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला या घटनेबद्दल समजल्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन करुन या बद्दल कळवलं. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत. पोलीस आपलं काम करतील. घटनास्थळी मुलगा हजर नव्हता. त्याची पिस्तुल मिळाली आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत” असं कौशल किशोर यांनी सांगितलं.

कौशल किशोर यांच्यावर आधी काय आरोप झालेला?

2021 मध्ये भाजपा खासदार कौशल किशोर यांची सून अंकिताच्या वडिलांनी आरोप केला होता. मुलीच कोर्टाच्या आवारातून अपहरण केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सुद्धा कौशल किशोर यांनी आरोप फेटाळून लावले होते. मुलगा आयुष सोबत अंकिता राहत असल्याच त्यांनी सांगितलं होतं. सूनेचे वडिल आशिष सिंह यांनी प्रतिमा मलीन करण्यासाठी असा आरोप केला असं ते म्हणाले होते.

Follow Us
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक