AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांवर हात उगारणारा मुलगा, आधी शिविगाळ, नंतर कानशिलात लगावली, कारण…………

एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवरच हात उगारला. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने वडिलांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे (man slapped his father in Ahmedabad).

वडिलांवर हात उगारणारा मुलगा, आधी शिविगाळ, नंतर कानशिलात लगावली, कारण............
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 24, 2021 | 3:16 PM
Share

अहमदाबाद (गुजरात) : आपण आयुष्यात जे काही यश मिळवतो ते केवळ आपल्या आई-वडिलांमुळेच. आपल्या आई-वडिलांमुळे आपलं अस्तित्व निर्माण होतं. त्यांच्या मेहनतीमुळेच लहानपणी आपण दोन वेळचं जेवण करु शकलेलो असतो. याशिवाय हे सुंदर जग आपण त्यांच्यामुळेच बघतो. या जगात आई-वडिलांइतकं प्रेम आपल्यासोबत कुणीही करु शकत नाही. त्यामुळे आई-वडिलांप्रती नेहमी कृतार्थ भावना ठेवणं अपेक्षित असतं. मात्र, अहमदाबाद येथे विचित्र घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवरच हात उगारला. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने वडिलांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे (man slapped his father in Ahmedabad).

मुलाविरोधात वडील पोलिसात

याप्रकरणी वडिलांनी आपल्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. प्रतापसिंह जाला असं वडिलांचं नाव आहे. प्रतापसिंह यांना त्यांच्या मुलाने स्वयंपाक घरातील कोणत्याही वस्तूला हात लावण्याआधी हात धुण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही म्हणून मुलाने त्यांना शिविगाळ केली. त्यानंतर त्याने वडिलांना धक्के मारुन स्वयंपाक घराच्या बाहेर काढलं. प्रतापसिंह स्वयंपाक घरातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या खोलीत डायनिंग टेबलवर बसले. यावेळी त्यांच्या मुलाने कोणताही मागचापुढचा विचार न करता थेट कानशिलात लगावली. तसेच त्याने प्रतापसिंह यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

प्रतापसिंह जाला आतून पूर्णपणे खचले

या घटनेमुळे प्रतापसिंह जाला आतून पूर्णपणे खचले. आयुष्यभर मुलासाठी खूप मेहनती केली. खूप खस्ता खाल्या. पण उतारवयात मुलानेच अशाप्रकारे लाथाळलं तर आपण कुणाकडे जायचं? असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. ते डायनिंग टेबलवर डोकं टेकून खूप रडले. त्यांच्या मुलाने स्वयंपाक घरात शिव्या देताना टेबल फॅन देखील मारण्यासाठी उगारला होता. त्यामुळे ते सुन्न होऊन डायनिंग टेबलवर बसले होते. पण डायनिंग टेबलवर बसताच त्यांचा मुलगा तिथे आला आणि त्याने थेट वडिलांना मारलं (man slapped his father in Ahmedabad).

पोलिसांचा तपास सुरु

संबंधित परिसरात या घटनेची निंदा केली जात आहे. परिसरच काय आता हा विषय संपूर्ण अहमदाबाद शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. एक मुलगा निर्दयीपणे आपल्या वडिलांना शिविगाळ आणि मारहाण कशी करु शकतो? असा प्रश्न अनेकांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा प्रचंड विचार केल्यानंतर प्रतापसिंह यांनी आपल्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा निर्धार केला. त्यांनी पोलिसात तक्रारही केली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपी मुलाला लवकर शिक्षा होईल, किंवा त्याला धडा शिकायला मिळेल, अशी आशा अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : अशी आहे सुष्मिता सेनच्या लेकीची ‘लव्ह लाईफ’, ‘बॉयफ्रेंड कोण’? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तरे देताना म्हणते…

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.