AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो ‘पाकिस्तान जिंदाबाद’ बोलला, त्यानंतर खूप भयानक घडलं, लोकांच्या मनातली चीड, संताप दिसला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांच्या मनात पाकिस्तानबद्दल प्रचंड चीड, संताप दाटला आहे. काहीही करुन पाकिस्तानला धडा शिकवा हीच भावना आहे. भारतात एका ठिकाणी क्रिकेट मॅच सुरु असताना एकजण 'पाकिस्तान जिंदाबाद' बोलला, त्यानंतर त्या व्यक्तीसोबत खूप भयानक घडलं.

तो 'पाकिस्तान जिंदाबाद' बोलला, त्यानंतर खूप भयानक घडलं, लोकांच्या मनातली चीड, संताप दिसला
crime news
| Updated on: Apr 30, 2025 | 10:35 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या सगळ्या देशात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड संतापाची भावना आहे. पाकिस्तानच कोणी समर्थन केलं, तर जनताच त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवत आहे. असाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान एका व्यक्तीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा दिली. त्यावर संतापलेल्या जमावाने त्या व्यक्तीला ठेचून मारलं. या प्रकरणात 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितलं की, 25 पेक्षा जास्त जणांनी मिळून हा हल्ला केला. कर्नाटकच्या मंगळुरुमध्ये भात्रा कल्लुर्ती मंदिराजवळ कुडूपू येथे रविवारी ही घटना घडली. त्या व्यक्तीने मॅच दरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा दिली होती, अशी माहिती गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याच आवाहन

उर्वरित हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. 25 पेक्षा जास्त लोक या हल्ल्यात सहभागी होते. “लोक एकत्र जमले आणि त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला” असं जी परमेश्वरा यांनी सांगितलं. तपास सुरु आहे, जी परमेश्वरा यांनी लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे. मंगळुरु शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, ग्रामीण पोलिसांना सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला.

लाठया, काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली 

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भात्रा कल्लुर्ती मंदिराजवळ क्रिकेट सामना सुरु होता. त्यावेळी एका गटाने या व्यक्तीला मारहाण केली. काही प्रत्यक्षदर्शींनी हस्तक्षेप केला, तरीही त्या व्यक्तीला मारहाण सुरु होती. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तपासातून ही बाब समोर आली आहे. त्याला लाठया, काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.