Jalgaon Crime : काहीच करत नाही, बाहेर जा आणि मर… पत्नीचा अपमान लागला जिव्हारी, पतीने थेट…
जळगावात पती-पत्नीतील वाद विकोपाला जाऊन एका संसाराचा दुर्दैवी अंत झाला. पत्नीने केलेल्या अपमानास्पद शब्दामुळे संतप्त पतीने टोकाचं पाऊल उचललं. यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली. नेमकं काय घडलं ?

संसारात पती-पत्नीचं नातं हे प्रेमावर तर असतंच, पण सुखी संसार करायचा असेल तर एकमेकांप्रती विश्वास आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आदरही पाहिजे. पती-पत्नी एकमेकांचा आदर करत नसतील, वाट्टेल तसं बोलत असतील तर वाद वाढू शकतात. आणि कधीकधी त्यातून अघटित असं काही घडू शकतं. अशीच एक दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना जळगाव जवळ घडली. तेथे भांडणादरम्यान एका पत्नीने पतीला उद्देशून असे काही शब्दव बोलले, ज्यामुळे एक संसार उध्वस्त झाला, क्षणात होत्याचं नव्हतं.
‘तू काहीच काम करत नाहीस, बाहेर जा आणि कुठेतरी मरून जा’ अस पत्नीने सुनावल्याने तो अपमान पतीच्या जिव्हारी लागला आणि त्याने त्याच संतापाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं . रागाच्या भरात पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपी पवन धुंदळे याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.
नेमकं घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक गावातील ही दुर्दैवी घटना आहे. लक्ष्मी पवन धुंदळे असं मृत महिलेचं नाव आहे. लक्ष्मी आणि पवन हे उटी बुद्रुक गावात रहायचे. शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना छोटीशी 7 महिन्यांची मुलगीही आहे. पत्नी नेहमीच पतीा अपमानास्पद वागणूक द्यायची असावा दावा केला जात आहे. घटनेच्या दिवशी लक्ष्मी आणि तिचा पती पवन यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी तिने त्याला बरंच सुनावलं. तू काम करत नाहीस, तू कुठेतरी जाऊन मर जा, अशा अपमानास्पद शब्दात पत्नीने पतीला सुनावलं होतं.
त्यांच्यात बराच वाद झाला. त्यानंतर रात्री सगळे झोपले होते, तेव्हाच पती पवन याने रागाच्या भरात निद्रिस्त पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला आणि तिचा खून केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तेव्हा त्याचे आई-वडीलही घरात होते, मता्र हा प्रकार पाहून ते अतिशय घाबरले आणि घराबाहेर पडले. त्यांनी थेट पोलीस पाटलचां घर गाठलं आणि खुनाची माहिती दिली. अखेर पोलिसांनी घटनास्तळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला, तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तर रागात पत्नीचा खुन करणाऱ्या,तिचा जीव घेणारा पती पवन याच्याविरोधात पोलिसांनी कलम 103 (1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला. नंतर आरोपी पवन याला अटक करण्यात आली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
