AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली, महिनाभर सोबत राहिली, अचानक रात्री दोघांचाही गळफास!

बुलडाण्याची जिल्ह्यातील विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली. त्याच्यासोबत एक महिना राहिलीही पण दोघांमध्ये मधल्या काही दिवसांत काय झालं माहिती नाही, अचानक राहत्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली, महिनाभर सोबत राहिली, अचानक रात्री दोघांचाही गळफास!
विवाहित महिलेचा प्रियकरासोबत गळफास
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 23, 2021 | 10:38 AM
Share

बुलडाणा : बुलडाण्याची जिल्ह्यातील विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली. त्याच्यासोबत एक महिना राहिलीही पण दोघांमध्ये मधल्या काही दिवसांत काय झालं माहिती नाही, अचानक राहत्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

नेमकं काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील 24 वर्षीय विवाहिता शीतल सपकाळ ही पती आणि पोटच्या दोन मुलांना सोडून गावातीलच तिच्या प्रियकरासोबत महिनाभरापूर्वी पळून गेली होती.

देवधाबा येथून दोघेही पळून गेल्यावर मुंबईमधील भांडुपच्या रामनगर परिसरात भाड्याने घर घेऊन पती-पत्नी म्हणून दोघे एकत्र राहत होते. मात्र 21 ऑक्टोबरला दोघांनी राहत्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

मृतक विवाहिता शीतल हिला चार आणि सहा वर्षाची दोन मुले असून दोघांनाही सोडून गेली होती. तर शीतल हरवल्याची तक्रार मलकापूर पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती, पोलिसांनीही शोध घेतला होता. पण त्यांचा पत्ता कळाला नव्हता.

अखेर 21 ऑक्टोबर दिवशी दोघांनीही गळफास घेतल्याची बातमी आली अन् गावात स्मशान शांतता पसरली. एकतर विवाहित शीतल नवऱ्याला आणि पोटच्या दोन मुलांना सोडून प्रियकराकडे निघून गेली. बरं एक महिन्याच्या आत असं काय घडलं, की दोघांनीही गळफास घेऊन आपलंल जीवन संपवलं, याचा विचार गावातील नागरिक करत राहिले.

हे ही वाचा :

आई-बाबांचा रोष पत्कारत लव्हमॅरेज केलं, पण लग्नानंतर तरुणीची अवघ्या 20 दिवसांत आत्महत्या

ही तर सैतानाचा अवतार, नग्न करुन महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न, रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांचा थरकाप

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा