अकोल्यातून लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त; तीन आरोपींना अटक, ‘असा’ झाला भांडाफोड

| Updated on: Feb 04, 2022 | 12:36 AM

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.

अकोल्यातून लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त; तीन आरोपींना अटक, असा झाला भांडाफोड
नकली नोटा जप्त
Follow us on

अकोला : अकोला जिल्ह्यातून (Akola district) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट नोटा (Counterfeit notes) चलनात आणणाऱ्या आरोपींना पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी एका व्यक्तीला हजार रुपयांची चिल्लर मागितली होती. संबंधित व्यक्तीने त्यांना चिल्लर दिली, त्याबदल्यात आरोपींनी पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या. मात्र थोड्याच वेळात या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्याने संबंधित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली, या प्रकरणातील आरोपीची झाडझडती घेतली असता, त्याच्याकडून  चलनातील खऱ्या 500 च्या 108 नोटा एकूण 54 हजार रुपये तसेच 500 च्या 1200 बनावट नोटा आणि एक स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

मुद्देमाल जप्त

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास शेख मुराद शेख अजीस यांना आरोपींनी हजार रुपयांची चिल्लर मागितली. त्याबदल्यात आरोपीने शेख मुराद यांना दोन पाचशे रुपयांच्या नोटा दिल्या, मात्र थोड्याच वेळात या नोटा बनावट असल्याचे शेख मुराद यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी तेल्हारा पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फीरवली व या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे खऱ्या 500 च्या 108 नोटा एकूण 54 हजार रुपये तसेच 500 च्या 1200 बनावट नोटा आणि एक स्कॉर्पिओ गाडी  आढळून आली, पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

चौथ्या आरोपीचा शोध सुरू

दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार झाला आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सध्या आरोपींची चौकशी सुरू असून, त्यांनी या नोटा नेमक्या आणल्या कुठून तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समोवेश आहे का? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Yavatmal : यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय

एकापेक्षा एक भारीतले ब्रॅन्ड गोव्यातून सोलापुरात आणले खरे! पण दारु रिचवण्याआधीच मोठी कारवाई

सोलापूर : एक नव्हे दोन नव्हे पठ्ठ्याने चोरल्या तब्बल 233 सायकल, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात