अत्याचाराची तक्रार दिल्याच्या राग, अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचाराची तक्रार दिल्याच्या राग, अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला
सोलापुरात अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 9:44 AM

सोलापूर / सागर सुरवसे : अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यात मुलीला डोक्यावर, कपाळावर इजा झाली असून, दोन बोटं देखील तुटली. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपींनी पीडित मुलीवर अत्याचार केला होता

पीडित तरुणी ही अल्पवयीन असून, तिच्यावर 5 मार्च रोजी याच दोघा आरोपींनी अत्याचार केला होता. त्यावरून आरोपींविरोधात 5 मार्च रोजी बार्शी पोलिसात पोस्को कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याच गुन्ह्याच्या तपास कामाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई वडील हे संध्याकाळी पोलीस ठाण्यात गेले होते.

मुलगी घरी एकची असताना आरोपींनी हल्ला केला

मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत रात्री 8 च्या सुमारास आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी हे पीडितीच्या घरी आले. आरोपींनी हातात असलेल्या सत्तूर आणि कोयत्याने मुलीवर सपासप वार केले. यामुळे मुलीला डोक्यावर, कपाळाला इजा झाली. धक्कादायक म्हणजे उजव्या हाताची दोन बोटं देखील तुटली.

हे सुद्धा वाचा

आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल

या हल्यानंतर पीडित मुलगी ही बेशुद्ध झाली. तिला बेशुद्ध अवस्थेतच बार्शीतल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या गंभीर प्रकारानंतर आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी विरोधात भादंवि 307, 324, 326, 34, 452, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.