AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघे दिवसभर एकत्र फिरले, रात्री लॉजवर आल्यानंतर मुलीने अशी अनपेक्षित कृती केली की मुलाचा जीवच गेला

मुलीने ती गर्भवती असल्याच सांगितल्यानंतर मुलाने लॉजच्या बाहेर तिला चाकूने धमकावलं. मुलगी खूप घाबरली. प्रियकराचा राग शांत करण्यासाठी ती त्याला सोबत घेऊन दिवसभर फिरली. रात्री दोघे पुन्हा त्याच लॉजवर गेले. तिथे रुम घेतली.

दोघे दिवसभर एकत्र फिरले, रात्री लॉजवर आल्यानंतर मुलीने अशी अनपेक्षित कृती केली की मुलाचा जीवच गेला
police
| Updated on: Sep 30, 2025 | 10:54 AM
Share

हत्येच एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. एका युवकाची हत्या करण्यात आली. युवकाची हत्या त्याच्या अल्पवयीन प्रेयसीनेच केली. लॉजवर प्रियकर झोपेत असताना प्रेयसीने त्याला संपवलं. प्रियकर झोपेत असताना अल्पवयीन प्रेयसीने त्याच्या गळ्यावर चार-पाच वार केले. प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद सद्दाम असं मृत युवकाचं नाव आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हा प्रकार घडला.

मृत मुलगा बिहार किशनगंजचा राहणारा आहे. आरोपी मुलगी बिलासपुरची आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतला आहे. प्रकरण रविवार रात्रीच आहे. प्रियकराची हत्या करुन अल्पवयीन प्रेयसी तिच्या घरी पोहोचली, तेव्हा आईची नजर कपड्यांवरील रक्ताच्या डागांवर गेली. आईने वारंवार विचारल्यानंतर युवतीने हत्येची कबुली दिली. मुलीकडून हे ऐकल्यानंतर आई घाबरली. तिने बिलासपूरच्या कोनी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

दोघे कुठल्यातरी हॉटेल किंवा लॉजवर उतरायचे

कोनी पोलिसांनी गंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. गंज पोलीस लॉजवर गेले. डुप्लीकेट चावीने रुमचा दरवाजा उघडला. लॉजच्या खोलीत युवकाचा मृतदेह पडलेला होता. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला आहे. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. तिचा मोबाइलही जप्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन युवती आणि मृत युवकामध्ये दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. दोघे अनेकदा रायपुरला भेटायचे. त्यानंतर दोघे कुठल्यातरी हॉटेल किंवा लॉजवर उतरायचे.

दोघे स्टेशनजवळच्या एका लॉजमध्ये गेले

युवक अभनपुरला रहायचा. एमएस इंजीनियरिंग वर्कशॉपमध्ये नोकरी करायचा. शनिवारी दोघांनी भेटण्याची योजना बनवली. युवती बिलासपुर ट्रेनने रायपुरला आली. दोघे स्टेशनजवळच्या एका लॉजमध्ये गेले. तिथे खोली घेतली. रात्री युवतीने युवकाला सांगितलं की, ती गर्भवती आहे. युवक त्यावर म्हणाला की, आता त्याचं शिक्षण सुरु आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो लग्न करु शकत नाही. युवकाने तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकत होता.

खोलीची चावी तिने रेल्वे ट्रॅकवर फेकून दिली

त्यानंतर रविवारी सकाळी दोघांनी लॉजमधून चेकआऊट केलं. संध्याकाळी परत त्याच लॉजवर आले. रुम घेतली. मुलगा गर्भपातासाठी सांगत असल्याने मुलगी नाराज होती. रात्री उशिरा युवती उठली. चाकू उचलला व युवकावर चार-पाच वार केले. युवकाने जागीच मृ्त्यू झाला. हत्या केल्यानंतर युवती लॉजची रुम बंद करुन बाहेर पडली. सकाळी 5.30-6 दरम्यान ट्रेनने पुन्हा बिलासपुरला परत आली. खोलीची चावी तिने रेल्वे ट्रॅकवर फेकून दिली.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.